Maharashtra Assembly Session: तुम्ही भिकारचोट योजना आणतायत; बच्चू कडू सरकारवर तुटून पडले

  • Written By: Published:
Maharashtra Assembly Session: तुम्ही भिकारचोट योजना आणतायत; बच्चू कडू सरकारवर तुटून पडले

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विधानसभेत (Maharashtra Assembly) बोलताना बच्च कडू (Bachchu Kadu</a>) यांनी राज्यासह केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. भाजपवाले असू दे की, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले असू की, आम्ही असू. शेतकऱ्यांना घामाचा दाम मिळत नाही. कोणत्याच सरकारमध्ये ही धमक नाही. तुम्ही भिकारचोट योजना आणतायत. दोन रुपयांनी धान्य देऊन भिकारचोट धंदा करत आहात, असे विधानही बच्चू कडू यांनी केले आहे.

Article 370 Verdict : कलम 370 वैध ठरवणारे न्यायमूर्ती आहेत तरी कोण?

बच्चू कडू म्हणाले, बऱ्याच सदस्यांची भाषण एेकली आहेत. ते पक्षाच्या हिताचे बरेच बोलते आहेत. पण शेतकऱ्यांवर कोणी बोलत नाही. पक्षाचे हीत साधून शेतकऱ्यांवर बोलणे हे मतलबी बोलणे आहे. धर्माचे प्रश्न सहज मिटून जातात. जाती-पातीसाठी सहज लोक उभे राहतात. शेतकऱ्यांसाठी कोणी उभे राहत नाही, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज काँग्रेसचा मोर्चा दिसल्याने मला चांगले वाटले. पण स्वामिनाथन आयोग 2006 मध्ये स्थापन झाला. पण त्यांनी स्वीकारला नाही. दोन वर्षांत स्वामिनाथन आयोगाने सहा रिपोर्ट सादर केले. स्वामिनाथन आयोगाचा एकही प्रश्न काँग्रेस आणि भाजपने पूर्ण केली नाही.

‘उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकीची, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिकांवर 50 टक्के नफा देण्याचे जाहीर केले होते. पण 50 टक्के नफा सोडाच. आज हमीभावाचा प्रश्न आहे. आम्ही शेतकऱ्यांचे मुले आहोत. आमच्या बापाचे रक्त असेल तर इमानदारीने बोलले पाहिजे. सोयाबीनला सहा हजार रुपये भाव दिला जातो. 2022-23 ची हमीभावाची शिफारस धरून सोयाबीनला 8 हजार 886 भाव मिळायला हवा होता. परंतु आता 6 हजार 800 रुपये भाव दिला जातो. दोन हजार रुपयांचा फरक आहे. येथे बसताना आम्हाला लाज वाटत आहे. पीक खर्चही निघत नाहीत. शेतकऱ्यांवर बोलण्यासाठी आमची औकात नाही. सगळे शेपूट घालून उभे आहेत. काँग्रेसच्या काळातही तेच होते आणि या काळात तेच आहे, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे.

खताचे भाव भरमसाठ वाढले आहेत. चारशे रुपयाचे खत तेराशे रुपयांवर गेले आहे. पण सरकार भिकारचोट योजना आणत आहे. दोन रुपयांनी धान्य देत भिकारचोट धंदा करत आहे. तुम्हाला आम्ही दोन रुपये किलोने गहू मागितला होता का ? लुटायचे क्विंटलने आणि द्यायचे किलोने. ही सगळी हकीगत बदलली पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube