‘उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकीची, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही’

‘उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकीची, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही’

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : काश्मिरसोडून गेलेल्या पंडितांना पुन्हा माघारी आणण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी (Narendra Modi) घेतील का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला होता. यारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम 370 वर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे, असे म्हटले आहे.

इतके वर्ष बाळासाहेब ठाकरे यांनी कलम 370 हाटवले पाहिजे अशी मागणी केली. त्यांची मागणी पूर्ण करण्याचे काम नरेंद्र मोदींनी केलं. ज्यावेळी नरेंद्र मोदी हे काम करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका राज्यसभेत वेगळी, लोकसभेत वेगळी, इकडेही, तिकडेही, तबलाही, डग्गाही अशा प्रकारची राहिलेली आहे, त्यामुळे त्यांना यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या, त्या भूमिकांच्या विरोधात असलेल्या लोकांना संसदेत त्यांनी साथ दिली आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

तुम्हाला कोण विचारतो तिकडं? जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं

सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मिरमधील कलम 370 हटवणे योग्य असल्याचा निकाल दिला आहे. तसेच सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घ्या, असा आदेश देखिल दिला आहे. या निर्णयानंतर नरेंद्र मोदींनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये निवडणुका घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की पाकव्याप्त काश्मिर भारतात आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारे आहोत. जे अशक्य होतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळाची वाट बघितली पाहिजे, असे म्हटले आहे.

‘शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सरसकट दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार….’; वडेट्टीवारांची मागणी

नवाब मलिकांना जो न्याय लावला, तोच न्याय प्रफुल्ल पटेल यांना लावणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केला होता. यावर ते म्हणाले की जो न्याय नवाब मलिकांना आहे. त्यांच्यासारखा आरोप, त्यांच्यासारखी जेल, त्यांच्यासारखी परिस्थिती इतर कोणाचीही असेल तर त्यावर तोच न्याय लागला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube