तुम्हाला कोण विचारतो तिकडं? जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं
Winter Session 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) प्रचाराला गेले होते. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी अधिवेशानात (Winter Session 2023) सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला तिकडं प्रचाराला जाण्याची गरज नव्हती. तिथं मोदींचा करिष्मा असताना तुम्हाला कोण विचरतो? असा टोला जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीसांना लागवला.
तुमच्या पक्षाला तीन राज्यात सत्ता मिळाली, आनंद आहे. पण तिथं नरेंद्र मोदींचा करिष्मा असताना तुम्हाला जाण्याची गरज नव्हती. तुम्हाला कोण विचारतो तिकडं? नरेंद्र मोदींचा करिष्मा असल्यामुळे विजय झाला. मुख्यमंत्री प्रचाराला गेले, दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेले, तिसरे उपमुख्यमंत्री प्रचाराला गेलेच नाहीत. ह्यांनी जाऊन काय फरक पडतो? दादांना जे कळलं ते अजून ह्यांना कळलं नाही, अशी टीका जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली.
तब्बल 17 वर्षांनी ‘चौहान’ राज संपुष्टात! मोहन यादव होणार मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री
गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी त्रासला होता पण त्यावेळी सत्ताधारी पक्षातील मंत्री शेजारच्या राज्यात प्रचारात गुंतले होते. इतर राज्यात प्रचार करायला आमची हरकत नाही पण आपला संसार फाटायला निघालाय आणि दुसऱ्याचा संसार जोडायला आपले मंत्री गेले. हे चित्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बरे नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संसार फाटलेला असताना ह्या सरकारला त्यांच्याकडे बघयला वेळ नाही, असे टीका जयंत पाटील यांनी केली.
कृषीमंत्र्यांनी घोषणा केली होती की दिवाळीच्या आधी पीकविम्याचे पैसे मिळतील. नाहीतर आम्ही दिवाळी साजरा करणार नाही. पण दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. आपल्या सर्वाची दिवळी झाली पण पीकविम्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. यात सरकराने ताबडतोब लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.