नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला? शरद पवारांच्या भूमिकेमुळे आघाडीत मिठाचा खडा

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला? शरद पवारांच्या भूमिकेमुळे आघाडीत मिठाचा खडा

Sharad Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशातच आता नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटच लढणार असल्याचा दावा उपनेते सुमित बागुल यांनी केला आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीमध्ये नाशिक लोकसभा (Nashik Loksabha) जागेवरुन खलबतं रंगली आहेत. या भेटीनंतर शरद पवारांनी नाशिकच्या जागेबाबत भूमिका मांडलीयं. येत्या 19 तारखेला होणाऱ्या बैठकीनंतर जागांचा फॉर्मूला ठरवणार असल्याचं ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता नाशिक लोकसभा जागेवरुन शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडाच पडल्याचं बोललं जात आहे.

बॉलिवूडचा खिलाडी, सिंघम अन् किंग खान केंद्राच्या रडारवर; तंबाखूच्या जाहिरातीसाठी थेट धाडली नोटीस

नाशिक लोकसभेची जागा ठाकरे गटाला सोडल्याच्या ठाकरे गटाचा दावा पवारांनी खोडला आहे. महविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे. १९ तारखेला दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. त्याआधी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी घेतली आशाताईंची भेट.. असा होता भेटीचा सोहळा

नाशिक लोकसभा मतदारसंघातून २०१९ साली शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले होते. गोडसे हे शिंदे गटातील नेते आहेत. त्यानंतर आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही नाशिकची जागा ठाकरे गटाकडे असावी, असा आग्रह शिष्टमंडळाकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना सुमित बागुल म्हणाले, आगामी निडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली.

‘मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन’; जाळपोळनंतर प्रकाश सोळंकेंनी दिला शब्द

आगामी निवडणुकीत काय रणनिती आखायची त्याबाबत चर्चा झाली. तसेच नाशिक लोकसभा जागेबाबत आमची चारही पक्षांसोबत चर्चा झालेली आहे. ही जागा ठाकरे गटाकडेचं राहणार असून शरद पवारांचे नाशिकमध्ये दौरे झाल्यास दोन्ही जागा आम्ही जिंकणार असल्याचा विश्वास सुमित बागुल यांनी केला आहे.

Road Accident : टायर फुटला अन् डंपरला धडकून कार पेटली; 8 प्रवाशांचा जळून मृत्यू

एकीकडे सुमित बागुल यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार असल्याचं सांगितलं तर दुसरीकडे शरद पवार यांनी त्यांचा दावा खोडला आहे. नाशिकच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नसून येत्या 19 तारखेला होणाऱ्या बैठकीत आम्ही जागांचा फॉर्मूला ठरवणार असल्याची भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या लोकसभा जागेवरुन वाद पेटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube