‘मराठा आरक्षणासाठी राजीनामा देईन’; जाळपोळनंतर प्रकाश सोळंकेंनी दिला शब्द
Prakash Solnake On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा शब्द राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मराठा आरक्षणाबाबच कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी सोळंकेंचं घर पेटवलं होतं. त्यानंतर आज आयोजित एका कार्यक्रमात सोळंकेंनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका मांडली आहे.
रणवीरनंतर आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने केले न्यूड फोटोशूट; म्हणालो ‘मी 7-8 दिवस एकटाच..’
प्रकाश सोळंके म्हणाले, सध्या राज्य विधी महामंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी माझा पाठिंबा राहिल. तसेच मराठा आरक्षणासाठी पुढील काळात मला जे करावं लागेल, आंदोलन, वेळप्रसंगी आमदारकीचा राजीनामाही देणार असल्याचा शब्दच प्रकाश सोळंके यांनी दिला आहे.
ओवेसींची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती : तेलंगणात राजकीय वादळ, भाजपचे राज्यपालांना पत्र
मराठा आरक्षणासंदर्भात जो लढा सुरु आहे. त्या लढ्याला माझा पाठिंबा असून मी राजीनामा देण्यासाठीही मागेपुढे पाहणार नसून योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचंही आमदार प्रकाश सोळंकेंनी स्पष्ट केलं आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण थक्क करणारं
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असतानाच प्रकाश सोळंके यांच्या वादग्रस्त विधानाची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंकेंच्या घरी जात हल्लाबोल चढवला होता. त्यांच्या घरासमोरील गाडी आणि घरही पेटवूनही दिल्याचा दावा प्रकाश सोळंके यांनी केला होता. एवढचं नाहीतर त्यांचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या घरीही जाळपोळीचे लोट पाहायला मिळाले होते. त्यानंतर बीड जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
‘फडणवीसांनी पत्र लिहिलं हा आश्चर्याचाच भाग’; जयंत पाटलांची टोलेबाजी
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर मराठा बांधव ठाम असून सरकारकडूनही त्यांना आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार का? हे येत्या 24 डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.