Video : मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं; आक्रमक आंदोलकांनी पेटवलं आमदार प्रकाश सोळंकेंचं घर

  • Written By: Published:
Video : मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं; आक्रमक आंदोलकांनी पेटवलं आमदार प्रकाश सोळंकेंचं घर

माजलगाव : सरसकट मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहे. ठिकठिकाणी या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. या सर्वामध्ये आंदोलकांचा फटका आता आमदारांना बसण्यास सुरूवात झाली असून, आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोलकांनी अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर हल्लाबोल चढवत त्यांचे घर आणि दारासमोरील गाडी पेटवून दिली आहे. त्यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या घटनेनंतर आमदार सोळेंकेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, घटनेपूर्वी मला आंदोलकांशी बोलण्याची संधी मिळाली नसल्याचे म्हणत जमावाने घरावर अचानक दगडफेक करण्यास सुरूवात केल्याचे म्हटले आहे. (Maratha Protesters Fire MLA Prakash Solake Car & Home In Majalgaon )

सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांना दणका : आमदार अपत्रातेप्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश

मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा असल्याचे सांगत काहीजण अर्धवट क्लिप समाज माध्यमात व्हायरल करून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याबाबतही तेच झाल्याचे सोळंकेंनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मला आंदोलकांशी बोलण्याची संधीच मिळाली नसल्याचे सांगत आंदोलक काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. माझ्या घराला चारही बाजूंनी वेढा दिल्याने चर्चा करण्याचा प्रश्नच आला नाही. माझ्या घराचं आणि घराबाहेर उभ्या असलेली गाडी आंदोलकांनी पेटवून दिली असून, यात माझं घरचं आणि गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

उपसमितीच्या बैठकीत काय झालं? 

एकीकडे मराठा आंदोलक आरक्षणासाठी आक्रमक होत असल्याचे चित्र असून, दुसरीकडे आज (दि.30) या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षणासंबंधित स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली. यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केल्याचे सांगितले. या समितीने आतापर्यंत 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. या समितीचा हा प्राथमिक अहवाल उद्या (31 ऑक्टोबर) कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘फडणवीस हे राज्यघटनेबाबत अज्ञान’; देवेंद्र फडणवीस यांच्यावर उल्हास बापट यांची सडकून टीका

मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देणार

मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यात कुणबी दाखले आणि रद्द झालेले आरक्षण पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत. यात जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली आहे. या समितीने आतापर्यंत 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. या समितीचा हा प्राथमिक अहवाल उद्या (31 ऑक्टोबर) कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यानंतर महसूल मंत्री सर्व कागदपत्रांची तपासणी करतील आणि पुढील कार्यवाही करतील असेही यावेळी एकनाथ शिंदेंनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube