‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमापूर्वी यवतमाळमध्ये राडा; मराठा आरक्षण आंदोलकांची आक्रमक निदर्शने

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमापूर्वी यवतमाळमध्ये राडा; मराठा आरक्षण आंदोलकांची आक्रमक निदर्शने

Maratha Reservation : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलक आणि मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्याचवेळी आज (सोमवार) यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. त्यावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला फासले काळे…

आज यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार नाहीत. कारण अजित पवारांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर फडणवीस हे छत्तीसगडमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला जाणार आहेत. याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या पोस्टरवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे.

World Cup 2023 मध्ये भारताचा विजयी ‘षटकार’तर इंग्लंडने केला ‘तो’ लाजिरवाणा विक्रम

या राड्यानंतर यवतमाळमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सुरक्षा दृष्टीने संपूर्ण विदर्भातील 3 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच सभास्थळी लोकांना तपासणी करून सोडण्यात येत आहे. या कार्यक्रमाला 35 हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. तर हा कार्यक्रम किन्ही या गावाजवळ ठेवण्यात आला आहे.

Israel Hamas War दरम्यान बायडेन यांचा नेतन्याहूंना फोन; म्हणाले, गाझा अन् हमास…

मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक :

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज मंत्रालयात बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक पार पडणार आहे. यामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समितीकडून सादर करण्यात येणार आहे. सोबतच या बैठकीत मराठीवाड्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेवर लागणाऱ्या पुराव्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याती कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube