पूजा खेडकर ‘मसुरी’ला गेल्याच नाहीत? मुदत संपल्यानंतरही नॉट रिचेबल

पूजा खेडकर ‘मसुरी’ला गेल्याच नाहीत? मुदत संपल्यानंतरही नॉट रिचेबल

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. हजर होण्यासाठी 23 जुलैपर्यंत मुदत होती. परंतु, या मुदतीत पूजा खेडकर मसुरीला हजर राहिल्या नाहीत अशी माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असून प्रसंगी त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. खेडकर यांना मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार त्यांना मंगळवारपर्यंत हजर होणे आवश्यक होते.

पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास 

पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात खेडकर यांचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांनी त्यांना दोनवेळा समन्स बजावले होते. मात्र त्या हजर राहिल्या नव्हत्या. या दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगानेही (UPSC) खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये? याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पुण्यात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या पूजा खेडकर यांना युपीएससी परिक्षेत 821 वी रँक मिळाली होती. त्यानंतरही त्यांना आयएएस केडर (IAS) मिळाले. यासाठी त्यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला जात आहे. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातून खेडकर यांनी दृष्टीहीन असून दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. यासोबतच त्यांची निवड ओबीसी प्रवर्गातून झाली होती. यासाठी वडिलांचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा अधिक असूनही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पूजा खेडकर कुटुंबियांना आणखी एक धक्का; महापालिकेने कंपनीच केली सील

दरम्यान,  पूजा खेडकरला अपंगत्व प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. पुणे जिल्हाधिकारी (Pune) कार्यालयाने वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आता या सगळ्यांची चौकशी होणार असून या चौकशीत काही तथ्य आढळल्यास कारवाई होण्याचीही शक्यता आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने तशा सूचना पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी चिंचवड पालिकेच्या वैद्यकिय विभागाला याबाबत आदेश मिळाल्याची माहिती आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube