IAS पूजा खेडकरच्या घराबाहेर अतिक्रमण; पुणे मनपाने बुलडोझर चालवला

IAS पूजा खेडकरच्या घराबाहेर अतिक्रमण; पुणे मनपाने बुलडोझर चालवला

IAS Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) कारनामे काही थांबत नसल्याचंचं दिसून येत आहे. खेडकर कुटुंबियांचं कारनाम्याचं सत्र सुरु असतानाच आता आणखी एक कारनामा समोर आलायं. पुण्यातील बाणेर इथल्या निवासस्थानाबाहेरील फुटपाथवर खेडकर कुटुंबियांनी अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी नोटीस बजावूनही प्रतिसाद न दिल्याने पुणे महानगरपालिकेने आज खेडकर यांच्या निवासस्थानाबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर चालवला आहे.

विशाळगडावर यासीन भटकळचं वास्तव्य! संभाजीराजेंच्या आरोपांनंतर मुश्रीफांनी मौन सोडलं

औंधमधील बाणेर रोड परिसरात नॅशनल हाऊसिंग सोसायटीमध्ये पूजा खेडकर यांचं निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेरील जमीनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तुमच्या घराबाहेरील फुटपाथवर 60 फुट लांब आणि 3 फुट उंचीचं बांधकाम असून ते तत्काळ हटवण्याबाबच्या सूचना महानगरपालिकेकडून देण्यात आल्या होत्या. या नोटीशीला खेडकर कुटुंबियांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने महानगरपालिकेच्या कारवाईला त्यांना सामोरं जावलं लागलंय.

IAS पूजा खेडकरांच्या वडिलांकडे बेहिशोबी मालमत्ता; प्राथमिक चौकशीनंतर दिलीप खेडकरांचा पाय खोलात

सुरुवातीच्या काळात पूजा खेडकर या केवळ त्यांच्या वागणुकीमुळे चर्चेत आल्या होत्या. स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याचे फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले. याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाला लिहिलेले पत्र समोर आले. त्यातून हे प्रकरण केवळ ऑडी गाडी पुरतेच मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

या पत्राप्रमाणे, खेडकर यांची ऑफिसमधील वागणूकही राजेशाही होती. स्वतंत्र केबिनची, गाडीची, बंगल्याची आणि शिपायाची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. जिल्हाधिकारी बाहेर गेले असताना, त्यांनी वरिष्ठांचे अँन्टी चेंबर बळकावल्याचेही समोर आले होते. त्यांच्या या वागणुकीवर बेशिस्तपणाचा ठपका ठेवत दिवसे यांनी पत्र लिहून खेडकर यांच्या बदलीची मागणी केली. त्यानंतर खेडकर यांची पुण्याहून वाशिमला बदलीही झाली. पण जसे जसे दिवस जातील तसे तसे त्यांच्याशी संबंधित रोज एक नवे प्रकरण समोर येत गेले. त्यांनी अपंगत्व आणि ओबीसी (नॉन क्रिमिलेअर) कोट्यातून युपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले. पण या दोन्ही प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यांनी 52 टक्के दृष्टी दोषाचे आणि मानसिकरित्या अस्वस्थाचे प्रमाणपत्र कसे मिळविले असे विचारले जाऊ लागले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube