IAS पूजा खेडकरांच्या वडिलांकडे बेहिशोबी मालमत्ता; प्राथमिक चौकशीनंतर दिलीप खेडकरांचा पाय खोलात
Dilip Khedkar : वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर (Dilip Khedkar) यांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे. खेडकर यांच्या संपत्तीची एसीबीने प्राथमिक चौकशीत केली असता, त्यांनी महाराष्ट्र सरकारमधील आपल्या सेवेदरम्यान बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचं उघड झालं. त्यामुळं आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल होऊ शकतो.
‘भाजपचा पराभव अजितदादांमुळेच’; RSS च्या मुखपत्रानंतर आता ‘विवेक’मधूनही टीकास्त्र
दिलीप खेडकर हे 2020 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) संचालक म्हणून निवृत्त झाले आहेत. पूजा खेडकर यांचे नवनवीन कारनामे समोर येत असतांनाच दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केली होती. एसीबीच्या पुणे युनिटने गुरुवारी सायंकाळी एजन्सीच्या राज्य मुख्यालयात प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला. खेडकर यांची कौटुंबिक संपत्ती 40 कोटींच्या वर असल्याचा दावा अनेक कागदपत्रांचा हवाला देत अहवालात करण्यात आला आहे.
आता विधानसभेचं ‘झाकणं’ उडवणार? विवेक कोल्हेंची पावलं शरद पवारांच्या दिशेने…
दरम्यान, आता एसीबी दिलीप खेडकर यांना नोटीस बजावून त्यांच्या उत्पन्नाचा आणि मालमत्तेचा तपशील मागवू शकते. सविस्तर अहवाल दिल्यानंतर दिलीप खेडकर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला जाऊ शकतो, असे एसीबीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
खेडकर यांच्याकडे मुंबई, पुणे, पुणे ग्रामीण आणि अहमदनगर येथे अनेक मालमत्ता आहेत. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले की त्यांच्याकडे सुमारे चाळीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
दिलीप खेडकर आणि त्यांची पत्नी मनोरमा खेडकर यांचा शोध घेत असलेल्या पुणे पोलिसांनी कुटुंबीय फरार असल्याचे सांगितले आहे. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. पूजा खेडकरची आई मनोरमा यांच्यावरही शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.