‘भाजपचा पराभव अजितदादांमुळेच’; RSS च्या मुखपत्रानंतर आता ‘विवेक’मधूनही टीकास्त्र
RSS On Ajit Pawar Group : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्याने घटक पक्षांचं नाव पुढे करुन टीका करण्यात आल्याचं दिसून आलं होतं. अजित पवार (Ajit Pawar) यांना बरोबर घेऊन भाजपने स्वत:चीच किंमत केली असल्याची टीका याआधी आरएसएसचे (RSS) मुखपत्र ऑर्गनायझरमधून करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा अजितदादांनी टीकेचे धनी व्हावं लागलंय. संघाच्याच ‘विवेक’ (Vivek) साप्ताहिकामध्ये अजित पवार यांच्यामुळेच भाजपचा पराभव झाला असल्याची टीका करण्यात आलीयं. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीयं.
Vicky Kaushal: “खतरनाक…”, विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अवघ्या 19 जागांवर विजय मिळाला होता. यामध्ये भाजपला 9, शिंदे गटाला 7 तर अजित पवार गटाने 1 जागेवर विजय मिळवला होता. तर महाविकास आघाडीला 31 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे राज्यात भाजपने नैसर्गिक युतीसह राष्ट्रवादीसोबत युती केल्याने भाजपच्या नेत्यांमध्ये काही अंशी नाराजी असल्याचंही साप्ताहिकात नमूद करण्यात आलंय. तसेच लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मस प्रभावी ठरल्याचं दिसून आलं नाही. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीलाच जबाबदार धरलंय.
Indrayani: इंदुचा किर्तनकार म्हणून प्रवास होणार सुरु, ‘इंद्रायणी’ मालिकेतील आषाढी एकादशी विशेष भाग!
राज्यात राष्ट्रवादीसोबत युती केल्याच्या परिणामांबाबत राष्ट्रीय नेतृत्वालाही कल्पना असून भाजप शिवसेना ही अनेक दशंकांपासून असलेली युती आहे. त्यात आता राष्ट्रवादीची एन्ट्री झालीयं. जून 2022 साली महाविकास आघाडीचं सरकार पाडून भाजपने शिंदे गटाशी युती केली. तर मागील वर्षी जुलैमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत हातमिळवणी करुन युतीत सामिल झाला. महायुतीत येताच अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं असल्याचं विवेक साप्ताहिकात स्पष्ट करण्यात आलंय. तसेच राज्यात स्थापन झालेल्या सरकारमधील पक्षाचे कार्यकर्त्यांची विचारसरणी एकसमान नाही. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही समन्वय नाही. भविष्यासाठी हे धोकादायक ठरु शकतं, असा अंदाजही साप्ताहिकातून व्यक्त करण्यात आलायं.
दरम्यान, महायुतीने राज्यातील 48 लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपने लढवलेल्या 28 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवला, मागील निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. तर शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या 15 जागांपैकी 7 विजय मिळवलायं. अजित पवारांनी 4 जागा लढवल्या मात्र त्यांना 1 च जागेवर विजय मिळवता आला.