अजितदादांना घरात स्थान पण पक्षात घ्यायचे की नाही हे कार्यकर्ते ठरवतील… : पवारांचे सूचक विधान

अजितदादांना घरात स्थान पण पक्षात घ्यायचे की नाही हे कार्यकर्ते ठरवतील… : पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar on Ajit Pawar return to NCP : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा होत्या. याच दरम्यान अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यामुळे अजित पवार देखील पवारांच्या राष्ट्रवादी पुन्हा जाणार का? अशा चर्चा सुरू असताना शरद पवार त्यांना पक्षामध्ये घेणार का? असा प्रश्न विचारला असता पवारांनी एका वाक्यात उत्तर देत अजितदादांच्या वापसीबद्दल स्पष्टच सांगून टाकलं. ते आज घेतलेल्या पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Vicky Kaushal: “खतरनाक…”, विकी कौशलचा पत्नी कतरिना कैफबाबत धक्कादायक खुलासा

या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी अजित दादांना पक्षांमध्ये जागा आहे का? असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षात मी व्यक्तिगत निर्णय घेणार नाही. संघर्षाच्या काळात माझ्यासोबत जे मजबुतीने उभे राहिले त्यांना याबद्दल अगोदर विचारणार. घ्यायचं की नाही हे ते ठरवतील. असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच्या वापसीवर आपली प्रतिक्रिया दिली. त्यामुळे एकीकडे अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा तर दुसरीकडे पवारांनी त्यांच्या परत येण्याबाबत केलेलं हे सूचक विधान राज्यातील राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत तर नाही ना? असं दिसत आहे.

विठ्ठला कृपा कर अन् राज्य दुष्काळमुक्त होवू दे, सुजय विखेंचे पांडुरंगाच्या चरणी साकडं

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीसह अजित पवार गटाची झालेली पीछेहाट यातून नाराज झालेले अजित पवारांचे आमदार त्याचबरोबर शिंदे आणि भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची झालेली अडचण यातून गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील अनेक नेते हे शरद पवारांसोबत पुन्हा जाणार असल्याचं बोललं जात आहे.

तर याच पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी विविध मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली. यामध्ये त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. १२ मत शेकापला देण्याचा शब्द दिला होता. त्यामध्ये ५० टक्के शेकापला ५० टक्के ठाकरेंना असं ठरलं होतं. (MLC) दरम्यान, एक नंबरची मत काँग्रेसला द्या असंही आपण सांगितलं होत असंही पवार म्हणाले. तर भुजबळांच्या भेटीवर पवार म्हणाले की, मला त्या दिवशी ताप होता, मी दोन दिवस सुट्टी घेतली होती. मला सांगितलं भुजबळ साहेब एक तासापासून आले आहे. जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर त्यांनी मला काही गोष्टी सांगितले. या गोष्टी केलं तर राज्याचं हित आहे असे ते म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube