Sharad Pawar यांच्या सात शिलेदारांची आमदारकी निश्चित; जाणून घ्या कारणं…
Sharad Pawar 7 leaders will Fix MLA in Vidhansabha : राज्यात लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभा निवडणुकीवर (Vidhansabha) लक्ष (Maharashtra Elections 2024) केंद्रीत केलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षफुट, सहानुभूतीची लाट तसेच भाजपविरोधातील वातावरण या सर्वांमुळे महविकास आघाडी आणि शरद पवारांना मोठं यश मिळालं. त्यानंतर आता महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाच्या 7 नेत्यांची आमदारकी (MLA) निश्चितच आहे. कोण आहेत? हे 7 नेते आणि त्यांचा विजय निश्चित असण्याची कारण काय? जाणून घेऊ सविस्तर…
लिहून घ्या, इंडिया आघाडी गुजरातेत भाजपला हरवणार; राहुल गांधींचं मोदींना ओपन चॅलेंज
यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील हे माजी मंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीत त्यांचं वर्चस्वाचं स्थान आहे. इस्लामपूर या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून ते सलग तीनदा या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळी देखील ते निश्चितच निवडून येतील. याचं कारण म्हणजे जयंत पाटील यांच्या नेतृत्वासह राज्यात शरद पवारांबाबतची सहानुभूती देखील आहेच.
त्यानंतर नाव येत ते मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड. आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. पक्षामध्ये फुट पडल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने सातत्याने खिंड लढवणारे नेते अशी त्यांची सध्या ओळख आहे. तर माजी मंत्री आणि मुंब्रा-कळवामध्ये ते सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे या मतदार संघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे.
भारतीय वंशाच्या डॉक्टरला रिपब्लिकन पक्षात मोठा मान, डोनाल्ड ट्रम्पसाठी बजावणार महत्वाची भूमिका…
तर आमदार रोहित पवार हे स्वतः शरद पवारांचे नातू असून एक तरूण आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. उद्योगांसह राजकारणात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या रोहित पवारांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. त्यानंतर त्यांनी थेट भाजपच्या राम शिंदे यांच्या बालेकिल्लेमध्ये जाऊन त्यांना शह दिला आहे. तरूण नेतृत्व, तरूणांचे प्रश्न मांडणे, रोजगार निर्मिती तसेच सोशल मिडीयाचा प्रभावी वापर या सर्व गोष्टींमुळे रोहित पवार अल्पावधीतच कर्जत-जामखेडचे लाडके आमदार झाले आहेत. यावेळी देखील तरूणाईच्या जोरावर त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार असल्याचं बोललं जात आहे.
‘टंकलेखन’ परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ, MPSC कडून परीक्षा रद्द
याच यादीतील आणखी एक नाव म्हणजे आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील. आर आर पाटलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आहे. आर आर पाटलांची स्वच्छ प्रतिमा, विकासकामं आणि सहानुभूती त्यांना प्रचंड फायदा झाला. त्यावर त्या 2014 ची पोटनिवडणूक 2019 ची निवडणूक जिंकल्या आहेत. तर यावेळी देखील मतदार संघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आणि राज्यात निर्माण झालेली शरद पवारांबाबतची सहानुभूती यावर त्या विजयी होऊ शकतात.
परमात्मा थेट पंतप्रधान मोदींच्या आत्म्याशी बोलतो; विशेष अधिवेशनात राहुल गांधी बरसले
त्यानंतर वडिलांचा समाजकार्याचा वसा पुढे चालवणारे अशोक पवार यांचं नाव येत. 2009 पासून ते सलग शिरूर हवेली मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांचा विजय निश्चित असण्याची कारणं म्हणजे घोडगंगा साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत. तळागाळातील लोकांशी त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये त्यांच्या पक्षाचा खासदार निवडून आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या वाढलेल्या मनोबलाचाही त्यांना फायदा होईल.
The Buckingham Murders Poster: करीना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’चे रहस्यमय पोस्टर रिलीज
तसेच बीडमधील संदीप क्षीरसागर यांचा देखील विजय निश्चित मानला जात आहे. 2019 मध्ये संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे चुलते जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. त्यानंतर आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीने मुंडे भावा-बहिणीचा गड असलेल्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंच्या रूपाने मोठा विजय मिळवला. त्यात संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघात सोनवणेंना मोठी आघाडी मिळाली होती. त्याचबरोबर जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्याला संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांनी हजेरी लावल्याने क्षीरसागर कुटुंब एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसं झाल्यास त्याचा फायदा संदीप क्षीरसागरांना त्याचा देखील फायदा होईल. असं बोलल जात आहे.
तसेच कराड उत्तर विधानसभेचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी येथून तब्बल पाच वेळा विजय मिळवलेला आहे. ते माजी मंत्री देखील राहिलेले आहेत. त्यांचा स्वतः असलेला दांडगा जनसंपर्क आणि शरद पवारांची त्यांच्या मतदारसंघातील ताकड याचा नेहमीच पाटील यांना फायदा झालेला आहे. तर आता राज्यात निर्माण झालेली शरद पवारांबाबतची सहानुभूती यावर ते विजयी होऊ शकतात.तर हे आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे 7 नेते आणि त्यांची आमदारकी निश्चित असण्या मागची कारण.