आरएसएसच्या ‘त्या’ लेखावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्याबद्दल…

आरएसएसच्या ‘त्या’ लेखावर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्याबद्दल…

Ajit Pawar on RSS Criticism : राज्याच्या राजकारणात महायुतीच्या पिछेहाटीची जशी चर्चा होत आहे तशीच चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर मुखपत्रातील लेखाची होत आहे. या लेखात आरएसएसने भाजप नेतृत्वावर चांगलीच आगपाखड केली आहे. तसेच महाराष्ट्रात काहीच गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतले म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या लेखातील टीकेवर अजित पवार गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आज खुद्द अजित पवार यांनी पहिल्यांदाच या मुद्द्यावर भाष्य केलं पण अगदीच त्रोटक.

अतिआत्मविश्वास नडला; आरएसएसच्या मुखपत्रातून भाजप नेतृत्वावर आगपाखड !

आगामी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या पालखी आणि पालखी मार्गांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने अजित पवार आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी ऑर्गनायझर मधील लेखाबाबत विचारलं. त्यावर अजित पवार यांनी जास्त बोलणं टाळलं. मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांची लोकं मतं व्यक्त करत आहेत. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तो त्यांचा हक्क आहे. त्यावर मला काहीच टीका टिप्पणी करायची नाही. सध्या मी विकासावर लक्ष केंद्रीत केलं आहे, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, यंदा लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. भाजपला कशाबशा नऊ जागा मिळाल्या. शिंदे गटाला सात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त एकच जागा निवडून आणता आली. अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपाचं नुकसान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आरएसएसनेही या लेखातून त्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आज मात्र अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना सावध प्रतिक्रिया दिली.

ऑर्गनायझरच्या लेखात नेमकं काय?

लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर टिप्पणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनावश्यक राजकारणाची गरज नव्हती. ते टाळले गेले असते. भाजप आणि शिंदे गट असे बहुमत असताना अजित पवार यांना सत्तेत का घेण्यात आले? शरद पवार हे दोन-तीन वर्षांत गायब झाले असते. कारण एनसीपीमधील चुलत भाऊ-बहिणीच्या वादात ते आपली ताकद संपवून बसले असते. तरीही चुकीचे पाऊल का उचलले गेले? असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला.

BMC तील अधिकाऱ्यामुळं सरकार अडचणीत येईल; भाजप नेत्याचा शिंदेंना इशारा नंतर ट्विटचं डिलीट..

भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढले आहेत. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने त्रास दिला. अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपने आपली किंमत कमी करून घेतली. राज्यात नंबर बनविण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. परंतु एका झटक्यात राज्यात आणखी राजकीय पक्ष निर्माण करण्यात हातभार लावला, असेही लेखात म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज