BMC तील अधिकाऱ्यामुळं सरकार अडचणीत येईल; भाजप नेत्याचा शिंदेंना इशारा नंतर ट्विटचं डिलीट..

BMC तील अधिकाऱ्यामुळं सरकार अडचणीत येईल; भाजप नेत्याचा शिंदेंना इशारा नंतर ट्विटचं डिलीट..

Mumbai News : भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराबाबत एक ट्विट केलं होतं. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. या ट्विटच्या माध्यमातून कंबोज यांनी थेट महायुती सरकारलाच इशारा दिला होता असे आता समोर आले आहे. महापालिकेतील एक भ्रष्ट अधिकाऱ्यामुळे राज्यातील सरकारच अडचणीत येण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्याला कंट्रोल करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मोहित कंबोज यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. आपल्याच सरकारला घरचा आहेर देण्याचं काम कंबोज यांनी केलं अशीही चर्चा सुरू झाली होती. यानंतर मात्र त्यांनी हे ट्विट डिलीट केलं

मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कोणाला नको होते? पवारांचा खुलासा.. ठाकरे व्हिलन?

कंबोज यांनी या ट्विटद्वारे बीएमसीतील एका अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. पुराव्यासह आपण या अधिकाऱ्याचे नाव उघड करू असा इशाराही त्यांनी दिला होता. आता हा अधिकारी कोण याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील एक एएमसी भ्रष्टाचाराचे सगळे रेकॉर्ड मोडत आहे. या भ्रष्ट अधिकाऱ्याला तुम्ही तत्काळ नोटीस द्या. या एका अधिकाऱ्यामुळं तुमचं सरकार अडचणीत येईल. या अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला आहे. त्याला कंट्रोल करण्याची हीच योग्य वेळ आहे असे कंबोज यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

यानंतर दुसऱ्या एक ट्विटमध्ये त्यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्याची भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. पुराव्यांसह या अधिकाऱ्याचे नाव उघडक करू असा इशारा त्यांनी या ट्विटमध्ये दिला होता. मोहित कंबोज यांनी नंतर हे ट्विट डिलीट केले. तोपर्यंत मात्र या ट्विटची चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. कंबोज यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.

फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी.. निकालानंतर भाजपमध्ये वॉर, मोहित कंबोज यांचा रोख कोणाकडे?

मोहित कंबोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. कंबोज मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. 2004 मध्ये ते मुंबईत आले होते. येथे 2005 मध्ये त्यांनी केबीजी ज्वेलर्स नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. व्यवसायात जम बसल्यानंतर 2012 ते 2019 या सात वर्षांच्या काळात इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. याच काळात 2013 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत राजकारणाला सुरुवात केली. पुढे सन 2014 मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज