‘आदित्य ठाकरेंना CM करा रश्मी ठाकरेंचा आग्रह पण, शरद पवारांचा नकार’; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

‘आदित्य ठाकरेंना CM करा रश्मी ठाकरेंचा आग्रह पण, शरद पवारांचा नकार’; अजित पवार गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीतील पाच टप्प्यांतील मतदान झालं आहे. राज्यातील सर्व मतदारसंघात मतदान झालं आहे. यानंतर राजकीय नेत्यांत गौप्यस्फोट करण्याची स्पर्धाच लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रि‍पदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र हे शक्य नसल्याने उद्धव ठाकरेंचे नाव पुढे करण्यात आले. शरद पवारांकडे तसा आग्रह धरला गेला, असे उमेश पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, 2019 मध्ये शरद पवारांनी अजित पवार व्हिलन होतील अशी भूमिका जाणीवपूर्वक घेतली होती. कारण त्यावेळी शिवसेना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याच्या प्रयत्नात होती. परंतु, रश्मी ठाकरेंच्या हट्टामुळे आदित्य ठाकरेंचं नाव पुढे करण्यात आलं. पण शरद पवारांनी नकार दिला. यानंतर अडीच वर्षे शिवसेना आणि अडीच वर्षे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री राहतील असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता.

त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

त्यामुळे आमची भाजपसोबत जी डील झाली होती ती फिरवण्यात आली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आले. अजित पवारांना क्षमा करून मुख्यमंत्री केलं असं ते सांगतात पण शरद पवारांकडे दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे त्यांना अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं. सर्वच आमदारांचं म्हणणं होतं की अजितदादांनाच उपमुख्यमंत्री करा. त्यामुळे शरद पवारांना हा निर्णय घ्यावा लागला, असे पाटील म्हणाले.

सन 2004 मध्ये शरद पवारांनी मुख्यमंत्री घेतलं नाही. त्यावेळी पक्षात सक्षम उमेदवार नव्हता असं ते म्हणतात पण भविष्यात त्यांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रिपद द्यायचं असेल त्यासाठी पक्षात दुसरं नेतृत्व नको म्हणून अजितदादांना मुख्यमंत्री केलं नाही असेही उमेश पाटील म्हणाले. यानंतर त्यांनी पाचव्या टप्प्यातील कमी मतदानाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंचं हे नेहमीचं रडगाणं आहे. त्यांना जर यंत्रणेवर विश्वासच नसेल तर ते कशाच्या आधारावर सांगत आहेत की आमच्या जास्त जागा निवडून येतील. मतदान जास्त व्हायला पाहिजे होते पण, मतदान कमी का झाले याची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे, असेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.

अजित पवार आणि शिंदे सेनेला धोक्याची घंटा, गरज संपेल तेव्हा भाजप…; शरद पवारांचं मोठं विधान

follow us
  • fb
  • instagram
  • youtube