त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

Sharad Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थि राहीले आणि उपस्थित केले जात आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी आपलाच पक्ष आहे असा दावा करत ते आता भाजपसोबत आहेत. तर, शरद पवार नव्या दमाने पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. परंतु, या सगळ्या काळात अजित पवार वारंवार शरद पवार यांच्यावर कोणत्या ना कोणत्या कारणाने टीका करत आहेत. तसंच, काही निर्णय चुकल्याचंही ते सांगत असतात. त्यातील काही आरोपांना शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना उत्तर दिलं आहे.

 

NCP चं गुपित फोडा; 5 गौप्यस्फोट करत तटकरेंची अजितदादांना साद

योग्य उमेदवार नव्हता

अजित पवार यांचा सातत्याने आरोप असतो की, 2004 ला काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा असतानाही शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. त्या आरोपाला शरद पवार यांनी आता उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, 2004 ला काँग्रेसला 69 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 71 जागा मिळाल्या होत्या हे खरं आहे. परंतु, त्यावेळी जास्त मंत्रीपदं घेऊन मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं. कारण राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता असा थेट दावा शरद पवारांनी केला आहे.

 

हा दावा निरर्थक आहे

त्याचबरोबर सुप्रिया आणि अजित पवार यांच्यामध्ये मी कधी भेद केला नाही. पक्षात जे काम करत गेले त्यांना संधी मिळत गेली असंही शरद पवार म्हणाले. अजित पवार वारंवार आपल्याला संधी मिळाली नाही असं म्हणत असतात. तसंच, आपण शरद पवारांचे चिरंजीव नाहीत म्हणून आपल्याला डावललं जात असंही ते म्हणत असतात. त्यावर उत्तर देताना शरद पवारांनी वरील उत्तर दिलं. तसंच, अजित पवारांचा हा दावा निरर्थक आहे असंही ते म्हणाले.

 

वसंतदादांचं उदाहरण देत अजितदादांनी सांगितला पराभवाचा इतिहास

पटेल हे भाजपसोबत जाण्यास आग्रही

जास्त जागा आल्या त्यावेळी छगन भुजबळांना मुख्यमंत्री करता आलं असतं या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती असा मोठा खुलासा पवारांनी केला आहे. त्याचबरोबर 2004 पासून प्रफुल्ल पटेल हे भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेत होते असा खळबळजनक खुलासाही पवारांनी केला आहे. तसंच, 2019 एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास आमची हरक नव्हती असा नवा खुलासाही पवारांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज