भाजप एकट्याने निवडणूक लढवणार, आरएसएससोबत गुप्त मंथन; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

भाजप एकट्याने निवडणूक लढवणार, आरएसएससोबत गुप्त मंथन; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

Jitendra Awhad : नागपूरमधील हिवाळी अधिवेशन (Winter Session 2023) संपल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली आणि त्या बैठकीत भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे फायनल झाले आहे. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी असे ठरले आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप-आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले.

ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

अजितदादांनी फक्त सांगावं मी बारामतीतून लढण्यास तयार…

दरम्यान, नागपूरमधील हिवाळी अधिवेनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत आरएसएसच्या मुख्यालयात गेले होते. मात्र अजित पवार गटाने संघ मुख्यालयात जाणे टाळले होते. आता जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर आता अजित पवार गट आणि शिंदे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येते हे महत्त्वाचे असणार आहे.

पुणे भाजपामधील चुरस थांबेना; आता राजेश पांडेही ‘जाकीट’ चढवून तयार

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन राज्यात सत्ता मिळाली आहे. या विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपने सर्वांना धक्का देत नवीन मुख्यमंत्रीपदाचे चेहरे दिले आहेत. यानंतर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्रीपदासाठी नवीन चेहऱ्याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube