‘सगेसोयरे’वरुन जरांगे पाटील आणि सरकारमध्ये मतभेद, बैठक निष्फळ

‘सगेसोयरे’वरुन जरांगे पाटील आणि सरकारमध्ये मतभेद, बैठक निष्फळ

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan), उदय सामंत, संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीत सगेसोयरे या शब्दावरुन गाडी अडल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी कुणबी (Maratha Reseravation) दाखले काढताना आईकडील वंशावंळ मुलांना लागू करावी, अशी मागणी केली होती.

बैठकीनंतर महाजन म्हणाले की विधानसभेत मराठा आरक्षणावर चार दिवस चर्चा झाली. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे, मागासवर्गीय आयोग नेमला आहे, आयोगाला 360 कोटींचा निधी उपलब्ध केले आहेत. सरकार आरक्षण देण्यावर ठाम आहे. त्यामुळे 24 डिसेंबरचा अल्टिमेटमचा जरांगे विचार करु नये अशी आमची त्यांना विनंती आहे, असे ते म्हणाले.

ते पुढं म्हणाले की मागील वेळी जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असताना आमच्या सहकाऱ्यांनी आरक्षण देताना सगेसोयरे असा शब्द वापरला होता. यातून जरांगेंनी व्याही असा अर्थ घेतला आहे. परंतु नियमांमध्ये हे कुठंही बसत नाही. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय यासंदर्भात झाले आहेत. कोर्टाने सांगितले आहे की मुलीकडील आरक्षण गृहीत धरले जात नाही. वडिलांकडील वंशावळीच्या नातेवाईकांना आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळते, असे महाजन यांनी सांगितले.

वंजारी समाजाचा क्रांतीकारी निर्णय : कालबाह्य ‘वाढीभाऊ’ पद्धत रद्द, 60 आडनावांमध्ये जुळणार विवाह

आपल्या कायद्यात रक्ताचे नातेवाईक असा उल्लेख आहे. पण लग्नानंतर मुलीचे ओबीसी सर्टिफिकेट पुढच्या नातेवाईकांना लागू होत नाही. आपल्याकडे वडिलांची वंशावळ मुलांना लागू होते. त्यामुळे आईचे आरक्षण मुलांना सर्टिफिकेट मिळत नाही. त्यामुळे आमच्यात सगेसोयरे या शब्दावरुन टाय झाली आहे. सोयरे शब्दांवरुन आमची थोडी आडचण झालेली आहे. या मुद्द्यावर देळी आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube