मोठी बातमी : असीम सरोदेंची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाची स्थगिती

Asim Sarode : असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने

  • Written By: Published:
Asim Sarode

Asim Sarode : असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवा यांच्या आदेशाला बार कौन्सिल ऑफ इंडियाने स्थगिती दिली आहे. हे प्रकरण खरोखरंच व्यावसायिक गैरवर्तनुकीचं आहे का? याबाबत सखोल तपासणी करूनच निर्णय द्यायला हवा होता असं बार कौन्सिल ऑफ इंडियाने म्हटले आहे.

असीम सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे असीम सरोदे यांच्यावर मोठी कारवाई करत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲन्ड गोवाने असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यासाठी रद्द केली होती. असीम सरोदे हे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असलेल्या सुनावणीत सहभागी असणाऱ्या वकिलांपैकी एक आहेत.

अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आणि न्यायालयांविषयी अविश्वास निर्माण झाल्याची तक्रार एका तक्रारदाराने केली होती. असीम सरोदेंचे वक्तव्य अशोभनीय, गैरजबाबदार व बदनामीकारक असल्याचे नमूद करून बार कौन्सिलकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.

follow us