पूजा खेडकर कुटुंबियांना आणखी एक धक्का; महापालिकेने कंपनीच केली सील
IAS Pooja Khedkar : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या (Pooja Khedkar) कुटुंबियांचे नवनवे कारनामे समोर येत आहे. पिस्तूल दाखवून शेतकऱ्याला दमदाटी केल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना (Manorama Khedkar) पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच खेडकर कुटुंबियांना आणखी एक दणका बसला आहे. तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pune News) सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख 77 हजार रुपयांचा कर थकीत आहे. यामुळे महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने कंपनीला सील ठोकले आहे.
जमीन खरेदी ते मनोरमा खेडकरांना धमकी; वकीलांचा न्यायालयात भलताच दावा
तळवडे गावठाण भागात ज्योतिबानगर येथे ही कंपनी आहे. ही कंपनी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांशी निगडीत आहे. याच कारणामुळे ही कंपनी वादात अडकली होती. कंपनी म. दि. खेडकर यांच्या नावावर आहे. कंपनीच्या सर्व कागदपत्रांची तपासणी महापालिकेने केली आहे. महापालिकेच्या कराबाबत माहिती घेतली असता काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या. कंपनीकडून सन 2009 पासून व्यावसायिक कराचा भरणा केला जात होता. 2022 मध्ये शेवटचा कर भरला आहे. त्यानंतर मात्र कर भरला गेलेला नाही.
कंपनीने जवळपास दोन लाख 77 हजार रुपयांचा मालमत्ता कर थकवल्याचे आढळून आले आहे. यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथकाने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या नेतृत्वात कंपनी सील करण्याची कारवाई केली. महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने ही कारवाई केली आहे.
मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांच्यावर दुसरी मोठी कारवाई; UPSC कडून गुन्हा दाखल
पूजा खेडकरवर UPSC कडून गुन्हा दाखल
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये? याबाबत उत्तर देण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत.