मनोरमा खेडकरांच्या अडचणीत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणात होणार सखोल चौकशी

मनोरमा खेडकरांच्या अडचणीत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणात होणार सखोल चौकशी

Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना आज महाडमधून पोलिसांनी अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला धमकवल्या प्रकरणात पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होती. शोध घेत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून मनोरमा खेडकर यांना महाडमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.

अटक केल्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना आज पौड न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी मनोरमा खेडकर यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला धमकवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मनोरमा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर पिस्तुल दाखवून शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत होते. मात्र पोलिसांना अद्याप पिस्तुल शोधायचे आहे आणि मनोरमा यांच्या अंगरक्षकांना ताब्यात घ्यायचे आहे तसेच यापूर्वी मनोरमा खेडकर यांनी मुळशी परीसरात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे पिस्तुलचा धाक दाखवून कोणास धमकाविले आहे का? याचा तपास करायचा असल्याने पोलिसांनी आज न्यायालयात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काही खुलासे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रकरण काय

पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ही जमिन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.

रील पडली महागात, 300 फूट खोल दरीत पडून अन्वी कामदारचा मृत्यू; जाणून घ्या सर्वकाही

या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube