Manorama Khedkar : मोठी बातमी! मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
Manorama Khedkar : आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना आज महाडमधून (Mahad) पोलिसांनी अटक केली आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये त्या लपून बसल्या होत्या.
शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या फरार होते. मात्र आज महाडमधील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल होत होता. अटकेनंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
#WATCH | Maharashtra: Trainee IAS Puja Khedkar’s mother Manorama Khedkar has been sent to police custody till 20 July by Judicial Magistrate Court Pune. https://t.co/nlQMgJgibB pic.twitter.com/VNdlji3gxN
— ANI (@ANI) July 18, 2024
पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयाकडे या प्रकरणात सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलिसांना सदर व्हिडीओतील पिस्तुल शोधायचे आहे आणि अंगरक्षकांना ताब्यात घ्यायचे असल्याने पोलिसांनी या प्रकरणात सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
प्रकरण काय
पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे.
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारस्कर यांची गाडी जाळली
धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ही जमिन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावल .
भुजबळ फिरता रंगमंच तर, पवार मोठे…; राऊतांच्या मनात नेमकी कोणती स्क्रिप्ट?