Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारस्कर यांची गाडी जाळली
Ajay Baraskar Car Burnt : मराठा समाजाला आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या विरोधात भूमिका घेणारे अजय बारस्कर (Ajay Baraskar) यांची पंढरपूरमध्ये (Pandharpur) अज्ञातांनी कार जाळली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, पंढरपुरात आषाढी वारीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी बारसकर गेले होते. तेव्हा त्यांची कार अज्ञातांनी जाळली. या प्रकरणात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अजय बारस्कर यांनी भूमिका घेत जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मराठा आंदोलनात त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने त्यांनी मनोज जरांगे विरोधात भूमिका घेतली असल्याची माहिती माध्यमांना दिली होती.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्त बारस्कर पढंरपुरात गेले होते मात्र तिथे अज्ञातांनी त्यांची गाडी जाळली. या घटनेत त्यांची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यानंतर बारस्कर यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप गाडी कोणी जाळली याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पंढरपुरमध्ये रात्रीच्या सुमारास त्याची गाडी एका ठिकणी पार्क केली असता गाडी पेटवून देण्यात आली. जेव्हा ही घटना तेथील लोकांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हा पर्यंत कार पूर्णपणे जाळली होती.
भाजपला घरचा आहेर! आमदार राजळे व प्रशासनाच्या विरोधात पदाधिकाऱ्यांचे उपोषण
तर दुसरीकडे बारस्कर यांनी या प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जरांगे पाटील यांच्यावर टीका करून वेगळी भूमिका घेतल्याने बारस्कर चर्चेत आले होते. जरांगे यांच्यावर टीका केल्याने आणि त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने अनेक कार्यकर्ते बारस्कर यांच्यावर नाराज आहे.