लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण

Arun Munde : शेवगाव शहराला (Shevgaon) गेलं पंधरा वर्षापासून आठ दिवसाला पाणी मिळत होतं मात्र आता महिन्यातून दोन वेळेस पिण्याचे पाणी मिळणारा राज्यातील एकमेव तालुका म्हणजे शेवगाव. शेवगाव शहर पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे तसेच शेवगावला पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने नागरी कामे प्रलंबित राहत आहेत.

शेवगाव शहरामध्ये महिन्यातून दोन वेळेस पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे नागरिकांची हाल होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या प्रश्नपासून सुटका मिळावी या मागणीसाठी भाजपचे अरुण मुंडे (Arun Munde) उपोषणाला बसले आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या विरोधात मुंडे हे उपोषणाला बसले आहे. शेवगाव शहरामध्ये महिन्यातून दोन वेळेस पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे विशेष करून महिलांना याचा जास्त त्रास होत आहे.

पंधरा ते वीस वर्षापासून शेवगाव शहराला पाणी मिळावं ही मागणी अनेकदा करण्यात आली आहे मात्र त्यावर आजपर्यंत तोडगा निघाला नाही. पिण्याच्या पाणीच प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्यासाठी वेळोवेळी महिलांनी पुढाकार घेत मोर्चा देखील काढला.

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बरस्कर यांची गाडी जाळली

विशेष म्हणजे महिला लोकप्रतिनिधी असतांना देखील महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही अत्यंत खेदजनक बाब आहे असा गंभीर आरोप मुंडे यांनी लगावला. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळेच शेवगावचा विकास खुंटला असल्याचा देखील यावेळी बोलताना मुंडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube