Loksabha Exit Poll : बीडचा निकाल आला; पंकजा मुंडे पवारांच्या शिलेदारावर ठरतायत भारी

  • Written By: Published:
Loksabha Exit Poll : बीडचा निकाल आला; पंकजा मुंडे पवारांच्या शिलेदारावर ठरतायत भारी

बीड : लोकसभेसाठी सातव्या टप्प्यातील शेवटचे मतदान आज (दि.1) पार पडले. त्यानंतर आता राज्यातील पहिल्या लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल समोर आला आहे. Tv9 पोलस्ट्राट आणि पीपल इनसाईट्सच्या एक्झिट पोलनुसार महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी आघाडी घेतली आहे. तर, शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे हे पिछाडीवर आहेत. (Maharashtra Loksabha Exit Poll Update)

Maharashtra Exit Poll : महाराष्ट्रात महायुतीला धक्का! पवार- ठाकरे यांची कमाल; वाचा आकडे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar Group) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली होती.  राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशी असल्याचे पाहण्यात मिळाले होते. यंदा महायुतीत अजित पवार गट सोबत असल्याने पंकजा मुंडेंचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे सोबत असल्याने यंदा पंकजांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली होती. पंकजांसाठी महायुतील अजितदादांसह अनेक दिग्गज नेते प्रचारसभेसाठी आले होते. एवढेच नव्हे तर, स्वतः पंतप्रधान मोदीही पंकजांना विजयी करा हे सांगण्यासाठी बीडमध्ये आले होते.

भाजपला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, बीडच्या प्रचारसभेत पवारांचे आवाहन

 मोदी सरकारला आलेली सत्तेची गुर्मी उतरवा, असं आवाहन बीड येथील प्रचार सभेत शरद पवारांनी (Sharad Pawar) केलं होते. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे, अशा शेतकरी विरोधी सरकारला हिसका दाखण्याची हीच वेळ आहे असं म्हणत बीडच्या निवडणुकीत शेतकरीपुत्र बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonwane) विजयी करा, असं आवाहन पवारांनी केलं होते. पण पवारांचे हे आवाहन मतदारांनी मनावर न घेता पंकजांना कौल दिल्याचे या अंदाजानुसार स्पष्ट होतं आहे.  केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत शेतकरी, महिला, नोकरदार आणि गरीबांवर अन्याय करण्य़ाचं काम केलं. या सरकारना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कधीही आस्था वाटली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांचा हिसका काय असतो हे या सरकारला दाखवून द्या, असेही पवार प्रचारसभेत म्हणाले होते.

मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान, दक्षिण भारतातही खातं उघडणार; ‘इंडिया’चीही टफ फाइट

गोपीनाथ मुंडे माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे

पंकजांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आले होते. यावेळी मोदींनी गोपीनाथ मुंडे माझ्याशी बीडच्या विकासबद्दल बोलायचे अशी आठवण सांगितली होती. तसेच गोपीनाथ मुंडे माझ्यापेक्षाही अनुभवी होते. तसेच, अरुण जेटली, सुषमा स्वराज अनुभवी लोक होते. त्यांना सोबत घेऊन मला देशाची सेवा करायची होती असा मी विचार केला होता. मात्र, भाजपचं सरकार येताच काही कालावधीतचं गोपीनाथराव मला सोडून गेले याचं मला आजही दु:ख आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली होती.

गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर विकासाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. गोपीनाथ मुंडे यांनी जे विकासाचे काम केलं ते करण्याची पूर्ण जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर असून आपण त्यांना अशीर्वाद द्या असं आवाहनही मोदी यांनी उपस्थितांना केलं. तसंच, बीड आणि मराठवाड्यातील अनेक प्रकल्प आपल्याला मार्गी लावायचे आहेत असंही ते यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज