पहिल्याच आठवड्यात ‘द गोट लाइफ’ची कोट्यवधींची कमाई, लवकरच पार करणार बजेटचा आकडा

पहिल्याच आठवड्यात ‘द गोट लाइफ’ची कोट्यवधींची कमाई, लवकरच पार करणार बजेटचा आकडा

Aadujeevitham The Goat Life Box Office Collection Day 7: आडू जीवनम: द गोट लाइफ’ने (Aadu Jeevitham: The Goat Life) रिलीज होऊन एक आठवडा उलटून गेला आहे, पण या चित्रपटाची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. इतर अनेक चित्रपट पडद्यावर असूनही, हा पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) स्टारर बॉक्स ऑफिसवर (Box Office) दररोज करोडो रुपयांचा गल्ला कमावत आहे. इतकचं नाही तर हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत रोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे.

सकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ने याआधी 7.6 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाचे कलेक्शन 6.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 7.75 कोटी रुपये आणि चौथ्या दिवशी 8.7 कोटी रुपये होते. पाचव्या दिवशी ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ने 5.4 कोटी आणि सहाव्या दिवशी 4.4 कोटींची कमाई केली. आता सातव्या दिवशी 3.75 कोटींचा व्यवसाय केला आहे.

‘मंजुम्मेल बॉईज’चा रेकॉर्ड मोडला

‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ने एका आठवड्यात एकूण 43.85 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह पृथ्वीराज सुकुमारन यांच्या चित्रपटाने ‘मंजुम्मेल बॉईज’चा विक्रम मोडला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट ‘मंजुम्मेल बॉईज’ने एका आठवड्यात देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 28.50 कोटी रुपये कमावले, तर ‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ने 43.85 कोटी रुपयांची कमाई केली.

Bhumi Pednekar: ना दीपिका ना आलिया अभिनेत्री भूमी ठरली यंग ग्लोबल लीडर्स; म्हणाली…

कथा

‘आडू जीवनम: द गोट लाइफ’ ब्लेसी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट बेनी बेंजामिन यांनी लिहिलेल्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात नजीब नावाच्या मुलाची कथा आहे, जो सौदी अरेबियाला कामासाठी जातो पण वाळवंटात हरवतो आणि शेळ्या मेंढ्या चरावायला लागतो. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन मुख्य भूमिकेत आहे. अमला पॉल, रिक ॲबे आणि शोभा मोहन यांसारखे स्टार्स महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज