‘बारामतीला कोणीही धक्का लावू शकत नाही’, शरद पवारांनी भरसभेत ललकारले

‘बारामतीला कोणीही धक्का लावू शकत नाही’, शरद पवारांनी भरसभेत ललकारले

Baramati Lok Sabha : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवारांमध्ये (Sunetra Pawar) लढत होत आहे. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघात लागला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांकडून जोरदार प्रचार पाहायला मिळाला.

आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी बारामतीला कोणीही धक्का लावू शकत नाही असं म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंविरोधात जोरदार प्रचार होताना दिसत आहे. अजित पवार जाहीर सभेत बारामती लोकसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून खासदार सुप्रिया सुळेंनी काहीच काम केलं नाही असा प्रचार करत आहे. तर आज अजित पवार यांच्या या प्रचारला उत्तर देत शरद पवार यांनी जाहीर सभेत बोलताना बारामतीकरांना आश्वासन देत बारामतीला कोणीही धक्का लावू शकत नाही असं म्हटलं आहे. यामुळे आता बारामती लोकसभा मतदारसंघात बाजी कोण मारणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बारामती मतदारसंघात 7 मे रोजी मतदार होणार आहे.

तर दुसरीकडे या जाहीर सभेत बोलताना कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवारांवर जोरदार हल्लबोल केला आहे. रोहित पवार म्हणाले, आज अजित पवार भाजपसोबत गेले कुटुंबातील एक सदस्य म्हणून मला वाईट वाटतो, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी पार्टी, चिन्ह आणि जागा देखील नेली. मात्र तुम्ही पवार साहेबांची जागा नेण्याचा पर्यंत केला तरी शरद पवार आमच्या ह्र्दयात आहे.

‘तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही’, पवारसाहेबांचे शब्द सांगत भरसभेत रोहित पवार रडले

गेल्या 60 वर्षात राज्यातील लोकांच्या हितासाठी पवार साहेबांनी कामे केली . शरद पवारांनी कधी मी केलं,मी केलं असं म्हणाले नाही . मी मी म्हणणारे आज भाजपसोबत गेले आहे. अशी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज