बारामतीची निवडणूक भावनिक की विकासावर?; ‘या’ फॅक्टर्समुळे हवा बदलणार?

बारामतीची निवडणूक भावनिक की विकासावर?; ‘या’ फॅक्टर्समुळे हवा बदलणार?

Baramati Lok Sabha : लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. यामध्ये बारामती लोकसभेची मोठी चर्चा सुरू आहे. या जागेवरून नणंद भावजय असा हा राजकीय संघर्ष आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं पारड जड मानलं जात असताना सुनेत्रा पवारांनी मुंसंडी मारल्याचं चित्र आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारातील काही घटनांनी ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 

सुनेत्रा पवारांचा मुळशी तालुक्यात प्रचार दौरा! 11 गावच्या सरपंचांनी दिला पाठिंबा

विकासाच्या मुद्द्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस प्रक्ष अजित पवार यांच्याकडे गेल्याने शरद पवारांबद्दल एक सहानुभूती आहे. तसंच, त्यांच्या वायाचा विचार करता तोही एक सहानुभूतीचा फॅक्टर ठरला आहे. त्यामुळे या सहानुभूतीचा फायदा होईल अशी स्थिती आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारंवार ही निवडणूक भावनीक होऊ देऊ नका, ही निवडणूक गावकी भावकीची नाही असं आवाहन केलेलं आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर व्हायला हवी असंही अजित पवार वेळोवेळी म्हणाले आहेत. आता सुनेत्रा पवारही मी निवडून आल्यानंतर बारामतीच्या सर्वांगीण विकासाला कसा हातभार लावेल असं सांगत आहेत. त्यामुळे ही निवडणूक हळूहळू भावनिकतेकडून विकासाच्या मुद्याकडे जात असल्याचं दिसंत आहे.

 

कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम

यामध्ये विचार केला तर सुरुवातीपासूनच शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि पुतणे अजित पवार यांच्याकडे पाहिलं जात होतं. अनेक काळ शरद पवार स्वत: निवडणुीच्या राजकारणात होते. परंतु, शरद पवारांनी यापासून स्वत:ला दूर केल्यापासून अजित पवार आणि सुप्रिया सुळे अधिक ठळकपणे समोर आल्या. या काळात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोघांचही नेतत्व मान्य केलं. मात्र, राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्य़ानंतर कार्यकर्त्यांमध्येही मोठी फूट पडली. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम अजित पवार करत आहेत. अनेक कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. असंच चित्र बारामती लोकसभा मतदारसंघातही आहे.

 

पवार कुटुंबातील मुलांशी लग्न केल्याने आम्ही पवार, सुप्रिया सुळे रक्ताने पवार

सुनेत्रा पवारांची जमेची बाजू

सुनेत्रा पवार यांची ओळख ही फक्त अजित पवार यांच्या पत्नी अशी नाही. या पलिकडेही त्यांची ओळख आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सुनेत्रा पवार निवडणुकीच्या मैदानात प्रत्यक्ष पहिल्यांदाच उतरल्या आहेत. मात्र, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा बारामतीत त्यांनीच यशस्वीपणे सांभाळली. अगदी सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची जबाबदारीही त्यांनी पेललेली आहे. बारामती तालुका आणि आसपासच्या परिसरात त्या गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहचल्या आहेत. त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. अजित पवार हे विविध मंत्रिपदांच्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व करत असल्याने बारामती परिसरातील विविध विकासकामांसाठी सुनेत्रा पवार यांनी यापूर्वी पुढाकार घेतलेला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज