सुनेत्रा पवारांचा मुळशी तालुक्यात प्रचार दौरा! 11 गावच्या सरपंचांनी दिला पाठिंबा

सुनेत्रा पवारांचा मुळशी तालुक्यात प्रचार दौरा! 11 गावच्या सरपंचांनी दिला पाठिंबा

Sunetra Pawar Mulshi Taluka Campaign : सर्वात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे बारामती लोकसभेची निवडणूक आहे. नणंद-भावजय एकमेकींच्या विरोधात मैदानात आहेत. महायुतीकडून सुनेत्रा पवार जोरदार प्रचाराला लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या येथील विद्यमान खासदार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजपर्यंत सामाजिक काम केली असली तरी त्यांची ही निवडणूक लढवण्याची पहिलीच वेळ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचा पहिलाचं संपर्क आहे. मात्र, लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे दौरे वाढले आहेत. आज सुनेत्रा पवार मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी अनेक गावांना भेट दिली.

 

11 गावच्या लोकांचा पाठिंबा

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज मुळशी तालुका दौऱ्यावर आहेत. तालुक्यातील दासवे गावात नागरिकांनी प्रचारसभेचे आयोजन केलं होतं. मोठ्या प्रमाणात परिसरातील 11 गावच्या सरपंच यांनी सुनेत्रा वहिनी पवार यांचा सत्कार करत आम्ही सर्व महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी सर्व नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या परिसरातील ज्या काही अडचणी असतील त्या आपण येणाऱ्या काळात महायुतीच्या माध्यमातून सोडवू असं आश्वासन नागरिकांन दिलं. तसंच, या निवडणुकीत नक्की विजयी करा असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना यावेळी केलं.

 

सह विधानसभा मतदारसंघ

बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला यांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत या जागेवर 21,14,716 मतदार होते. 1955 मध्ये येथे पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसचे केशवराव जेधे विजयी झाले होते. 1960 च्या पोटनिवडणुकीत आणि 1967 च्या निवडणुकीत काँग्रेसचे गुलाबराव जेधे खासदार म्हणून निवडून आले होते. 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर.के.खाडीलकर तर 1977 मध्ये जनता पक्षाचे संभाजीराव काकडे विजयी झाले. 1980 मध्ये काँग्रेसने पुन्हा ही जागा काबीज केली आणि शंकरराव बाजीराव पाटील खासदार झाले. दरम्यान, 1984 साली शरद पवार यांनी भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्षाकडून पहिल्यांदा येथून निवडणूक जिंकली. यापूर्वी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून 6 वेळा, त्यांची कन्या सुप्रिया सुळे 3 वेळा आणि त्यांचे पुतणे अजित पवार एकदा खासदार झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज