Sunetra Pawar : एकत्र मिळून तोडगा काढू, कमिन्सच्या कामगारांना सुनेत्रा पवारांचा शब्द
Sunetra Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha) महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी आज कोथरूड येथे कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या (Cummins India Limited Company) कामगारांशी संवाद साधत प्रचाराची सुरुवात केली. यावेळी त्यांनी कामगारांच्या अडचणी समजून घेत त्यावर आपण एकत्र मिळून सर्व तोडगा काढू असा विश्वास व्यक्त करत 7 मे रोजी घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी कामगारांना केला.
तसेच यावेळी कामगारांनी सुद्धा आम्ही महायुतीच्या सोबत असल्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांना दिला. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीचे (Mahayuti) सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पदयात्रेत जनसागर उसळला
यानंतर सुनेत्रा पवार यांनी धनकवडी परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेत अलोट जनसागर उसळला होता. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा धनकवडी परिसरातील नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत करून आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास सुनेत्रा पवार यांना दिला.
या पदयात्रेत सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार भीमराव तापकीर, भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
… म्हणून रिंकू सिंग आणि केएल राहुलची संघाच्या बाहेर, आगरकरने सांगितले खरं कारण
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत असल्याने सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांना टक्कर देणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. 7 मे रोजी बारामती मतदारसंघात मतदान होणार असून यावेळी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.