बारामतीत कुठली कंपनी आणली सांगा, मग बाकी बोला; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

बारामतीत कुठली कंपनी आणली सांगा, मग बाकी बोला; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

Rohit Pawar Criticize Ajit Pawar on MIDC : अजितदादा ( Ajit Pawar ) स्वतः बारामती विधानसभा आमदार आहेत. तिकडे अजित दादांनी कुठली कंपनी आणली? हे सांगावं मग बाकी तालुक्यातील बोलावं. असा टोला रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी लगावला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना अजित पवार यांच्या एमआयडीसीबाबतच्या ( MIDC ) वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

“अठरा वर्षांतील विकासकामं म्हणजे टीमवर्क”; अजितदादांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर

रोहित पवार म्हणाले की, अजितदादा स्वतः बारामती विधानसभा आमदार आहेत. तिकडे अजित दादांनी कुठली कंपनी आणली? हे सांगावं मग. बाकी तालुक्यातील बोलावं. बारामती एमआयडीसीमधील कंपनी कोणी आणल्या ते पण दादांनी सांगावं.माविआ सरकार आल्यावर नेत्यांना पद मिळाली. नेत्यांनी विकास केला माविआ सरकारमधे असताना निधी घेऊन गेले. साहेबांच पण काम आहे. सगळ आपण केलं असं कसं म्हणतात दादा. असा सवाल रोहित पवारांनी केला.

उत्तर मध्य मुंबईत ट्विस्ट! वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकमांना टक्कर देणार माजी पोलीस अधिकारी?

तसेच पुढे ते इतर विषयांवर देखील बोलले महाजन नाहीत आत पूनम महाजन या भाजपमधील पुढच्या पिढीला तिकीट मिळाले नाही. भाजप बदलेली आहे. बारामतीमधील पण भाजप आमच्या सोबत आहे. मला व्हिडीओ आला. राणा याच्या सभेतील मी तो टाकला. नवनीत राणा यांनी पण सगळ टाकावं,विकास बाबत भाजप कमिशन घेत आहेत. अवघड सीट वाटत तिथं मोदी याची सभा होत नाही. पुण्यात एक सभा आहे. त्यांना अवघड वाटते तिथं सभा घेतं नाहीत. धंगेकर पुण्यात प्लस आहेत. भाजपवर अनेक जण नाराज आहेत. पुण्यात काँग्रेस पुढे आहे. म्हणून मोदी साहेब आले तर मतदार वळेल असं वाटतय.

खडकवासला विधानसभा मतदारसघात आम्ही 80 हजार मताच लीड घेऊ. केंद्र सरकार दूजाभाव करत आहेत. कांद्याबाबत निर्णय घेतला. गुजरात कांदा आता बाहेर येईल. गेले दोन महिने मी बोलत होती. गुजरातसाठी हे केलंय का? 5 हजार कोटी नुकसान राज्यातील शेतकरी झालं आहे. त्यामूळे राज्यात महाविकास आघाडीच्या 35 जागा निवडून येतील. माझा केजरीवाल होऊ शकतो रोहित पवार यांना भीती. निष्ठेची लढाई विरुद्ध अस्तित्वाची लढाई अशी निवडणूक बारामतीमध्ये आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube