“अठरा वर्षांतील विकासकामं म्हणजे टीमवर्क”; अजितदादांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर

“अठरा वर्षांतील विकासकामं म्हणजे टीमवर्क”; अजितदादांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर

Supriya Sule replies Ajit Pawar : बारामती मतदारसंघात राजकीय वातावरण आता चांगलंच ढवळून निघत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले आहेत. तर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार स्वतः प्रचारात गुंतले आहेत. अजित पवार यांनी काल एका प्रचार सभेत सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. माझ्या कामाचं श्रेय सुप्रिया सुळे घेत असल्याचे अजितदादा म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर आज सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

सुळे आज पुण्यात होत्या. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांनी अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं. त्यावर सुळे म्हणाल्या, 18 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे आतापर्यंत जी विकासकामे म्हणजे टीमवर्क आहेत. अजित पवारांनी माझ्यावर टीका केली. पण, दादा माझ्यापेक्षा वयाने, पदाने आणि नात्याने मोठे आहेत. मोठ्यांचा आदर सन्मान करायचा असतो तो मी करते.

Rohit Pawar On Ajit Pawar : हाच का तुमचा स्वाभिमान?, अजित पवारांवर रोहित पवारांचा घणाघात

मतदारसंघात एमआयडीसी यावी यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करत होतो. यामुळे येथील बेरोजगारीचा प्रश्न कमी होईल. तरुणांना रोजगार मिळेल. मागील 18 वर्षे तर दादाच पालकमंत्री होते. त्यावेळी एमआडीसी का आणता आली नाही, असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांना संधी नाकारत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. महायुतीच्या या निर्णयावर सुप्रिया सुळेंनी आश्चर्य व्यक्त केलं. पूनमने अनेक वर्षे चांगलं काम केलं आहे. प्रमोद महाजन हे खूप मोठं नाव भाजपमध्ये नाही तर देशाच्या राजकारणात होतं. पूनमने युवा मोर्चाचं काम केलं आहे. त्यांचं तिकीट का कापण्यात आलं याचं कारण मला माहिती नाही पण, माझ्यासाठी हे आश्चर्यकारक आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

उत्तर मध्य मुंबईत ट्विस्ट! वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकमांना टक्कर देणार माजी पोलीस अधिकारी?

तुतारी वाजवून आम्ही मोदींचं स्वागत करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात सभा होत आहे. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळेंनी खोचक शब्दांत उत्तर दिले. अतिथी देवा भव! जेवढे पाहुणे येतील, त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. तुतारी वाजवून आम्ही येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यानंतर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले आहेत हे मला माहिती नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही. दुष्काळ ,महागाई बेरोजगारी ही माझ्यासाठी आव्हाने आहेत. देश आधी नंतर राज्य आणि मतदारसंघ. मला काम करायचं आहे यावरून लक्ष  विचलित करण्यासाठी हे अशी टीका करतात, असे सुळे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube