भाजपाने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजनांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, दहा वर्षांच्या खासदारकीत…

भाजपाने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजनांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या, दहा वर्षांच्या खासदारकीत…

Mumbai Lok Sabha Election : भाजपाने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांना (Poonam Mahajan) संधी नाकारत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना तिकीट दिलं. या मतदारसंघात महाविकास आघाडीने माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा होती. अखेर या मतदारसंघात भाजपने लोकप्रिय चेहरा म्हणून निकम यांना (Ujjwal Nikam) उमेदवारी जाहीर केली. या घडामोडींनंतर खासदार पूनम महाजन यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.

दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते. माझे वडील स्व. प्रमोद महाजन यांनी मला नेहमीच राष्ट्र प्रथम नंतर आपण हा जो मार्ग दाखवला तोच मार्ग मला आयुष्यभर चालवता यावा यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सदैव देशाच्या सेवेसाठी समर्पित असेल.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन (Poonam Mahajan) यांना होणारा विरोध पाहता आता भाजपकडून या मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे सरकारी वकील असून दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. यानंतर निकम यांचं नाव देशविदेशात पोहोचलं.  त्यांच्या याच लोकप्रियतेमुळे भाजपने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं होतं.

मोठी बातमी! पूनम महाजनचा पत्ता कट, मुंबई उत्तर मध्य मधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

दोन दिवसापूर्वी काँग्रेसकडून मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यामुळे महायुतीकडून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. महायुतीकडून या मतदारसंघात यापूर्वी अनेक नावांची चर्चा होती मात्र आता महायुतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube