Ujjwal Nikam : सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही गटाला प्रश्न, निकाल काय लागू शकतो?

  • Written By: Published:
Ujjwal Nikam : सर्वोच्च न्यायालयाचे दोन्ही गटाला प्रश्न, निकाल काय लागू शकतो?

सुप्रीम कोर्टात दुसऱ्या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशीची राज्यातील सत्तासंघर्षाची आजची सुनावणी संपली आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला, त्यांनतर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अ‍ॅड. नीरज किशन कौल, अ‍ॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करणार आहेत.

शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरु केला आहे. आज दिवसभर त्यांनीच शिंदे गटाकडून युक्तिवाद केला. नीरज कौल यांनी विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, प्रतोदचे अधिकार, विधिमंडळ गट आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक आणि साम्य अशा अनेक मुद्द्यावरून कौल यांनी युक्तिवाद केला. आज झालेल्या युक्तिवादावर जेष्ठ वकील उज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाचे कोणते मुद्दे शिंदे गटाकडून खोड़ून काढण्यात आले? आज कोर्टाचे काय घडलं

उज्वल निकम म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने आज दोन्ही गटाला काह प्रश्न विचारले आहेत. २१ जून रोजी शिवसेना पक्षात दोन गट झाल्याचे दिसते आहे, कारण या दिवशी ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून वेगवेगळे व्हीप देण्यात आले होते. तर याला पक्षातील फूट म्हणता येईल का ?

पुढचा प्रश्न न्यायालयाने असा विचारला की बहुमत चाचणी झाल्यानंतर शिंदे गटाने सरकार स्थापनेचा दावा केला होता का ? तिसरा प्रश्न १० परिशिष्ठानुसार अपात्रता कधी सूर होते ? असे प्रश्न न्यालयाकडून विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांमधून सुप्रीम कोर्टाकडून परिशिष्ट १० मजबूत करण्यासाठी आणखी काही करता येईल, याचा विचार सुरु आहे. असं मत निकम यांनी व्यक्त केले आहे.

येत्या १-२ दिवसात युक्तिवाद संपेल

सध्या जरी युक्तिवाद कधी संपेल हे सांगता येत नाही, पण येत्या १-२ दिवसात युक्तिवाद संपेल आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल. असं मत निकम यांनी व्यक्त लागेल.

न्यायालयाने दोन्ही गटाला अनेक प्रश्न विचारले आहेत, या प्रश्नांमधून न्यायालयाने दोन्ही गटाकडून १० परिशिष्टाच उल्लंघन कोणी केलं आहे का? याची तपासणी या प्रश्नांच्या मधून केलं जात आहे. अशी माहिती निकम यांनी दिलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube