बारामतीत मत खरेदीसाठी दिडशे कोटींचा वापर; Rohit Pawar यांचा अजितदादांवर गंभीर आरोप
Rohit Pawar Criticize Ajit Pawar and BJP on vote Purchase : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील बारामती मतदारसंघातील लढत ही प्रतिष्ठेची आणि पवार कुटुंबामध्ये होणार आहे. त्यामुळे येथे एकीकडे अजित पवार ( Ajit Pawar ) आणि दुसरीकडे उर्वरित पवार कुटुंब जोरदार प्रचाराला लागलं आहे. त्या दरम्यान माध्यमांशी बोलत असताना रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी बारामतीमध्ये मत खरेदीसाठी पैशांचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप अजितदादांसह भाजपवर ( BJP ) केला.
कोल्हापूरच्या बंडखोराविरोधात काँग्रेसचं कठोर पाऊल : ठाकरेंच्या मागणीनंतरही विशाल पाटलांना मात्र अभय?
यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या विचाराने चालणारे काही कारखाने आहेत. त्या सगळ्यांची कॅपॅसिटी 80 हजार टनांची आहे. त्यासाठी पाच हजार कोटी लागले असतील. त्यातील अनेकांवर ईडी सीबीआय कारवाई सुरू आहे. पण त्यातील कामगार लोकांना घरोघरी जाऊन मत किती आहेत. हे का विचारलं जातं आहे? कारण यामध्ये पैश्याचा खूप मोठा वापर मत खरेदी करण्यासाठी होणार आहे. दीडशे कोटी रुपये यात असणार अस बोललं जात आहे. एका कार्यकर्त्यांनी मला सांगितले. मग हा पैसा आला कुठून? पैसा, अर्थकारण गुंडांचा वापर केला जातं आहे. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
Vicky Kaushal: छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकीचा जबरदस्त लूक; ‘छावा’ची प्रचंड चर्चा
तसेच यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांच्या मतदारांना फंडाचं अमिष दाखवण्याबाबत केलेल्या स्टेटमेंटवर आम्हाला निवडणूक आयोगाकडे जावं लागेल. असं म्हटलं आहे. कारण ते अप्रत्यक्षपणे सामान्य लोकांना विकत घेत आहेत. पदाचा वापर करून दहशत पसरवत आहेत, दादांना मला एवढंच सांगायचं आहे की, 4 जूनला निकाल लागेल तेव्हा महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून येतील. आमचं सरकार आल की तुम्ही पालकमंत्री नसणार आहात. असं म्हणत रोहित यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
तसेच यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांच्या भाषणातील विधानावरून देखील त्यांना टोला लगावला की, विचार सोडून भाजपसोबत जाता जेव्हा तिथे गेल्यावर कशाबाबत बोलायचं हे कळत नाही. भाजप विरुद्ध सामान्य लोक लढाई आहे. तर सुनेत्रा पवार या आपल्या भाषणात म्हटल्या होत्या की, ही लोकसभा निवडणूक म्हणजे मोदी विरूद्ध राहुल गांधी यांची आहे.