पार्थ आणि जय मॅच्युअर, टीका करणाऱ्या इतर पवारांनी भान ठेवावं; अविनाश आदिकांचा टोला

पार्थ आणि जय मॅच्युअर, टीका करणाऱ्या इतर पवारांनी भान ठेवावं; अविनाश आदिकांचा टोला

Avinash Adik on  Jay Pawar : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात महायुतीच्या (Mahayuti) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि महाविकास आघाडीच्या  सुप्रिया सुळे यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आमदार रोहित पवारांसह श्रीनिवास पवार, शर्मिला पवार सातत्याने अजित पवारांवर टीका करत आहेत. त्यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अविनाश आदिक (Avinash Adik) यांनी भाष्य केलं. पार्थ आणि जय पवार मॅच्युअर आहेत. इतर पवारांमध्ये ती मॅच्युरिटी दिसली असती बरं झालं असतं, असा टोला अविनाश आदिक यांनी लगावला.

Devendra Fadnavis : मंडलिकसाठी फडणवीस मैदानात, चंदगडकरांना दिला मोठा शब्द 

आदिक म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून अजितदादांनी पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. पक्ष संघटना वाढवली आहे. याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही. गेली आठ-दहा महिने सोडली तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अजितदादांच्या कार्यपद्धतीवर शंका नव्हती. मात्र, आता सुनेत्रा पवार विरुध्द सुप्रिया सुळे अशी लढत होत असल्याने अनेकजण अजितदादांवर टीका करायला लागले, अचानक अजित पवारांच्या वागण्या-बोलण्यात आणि कार्यपद्धतीत त्यांना दोष वाटायला लागला.

ब्रृजभूषण यांचा मुलगा फक्त डमी उमेदवार, खरी सत्ता ब्रृजभूषणच…; साक्षी मलिकची संतप्त 

ते म्हणाले, मला पार्थ पवार आणि जय पवारांचं मोठं कौतुक वाटतं. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत होत असलेल्या टीकेवरून त्यांनी कुटुंबातील कोणत्याही सदस्यांबाबत कुठलंही चुकीचं विधान केलं नाही. यातून त्यांची मॅच्युअरिटी दिसून येते. हेच सर्वाच्या बाबतीत दिसलं असतं तर बरं झालं असतं, असा टोलाही त्यांनी रोहित पवारांना लगावला. पुढं ते म्हणाले, आपण सगळेच यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेत असतो. त्यांच्या संस्कारावर आधारीत समाजकारण-राजकारण करत असतो, याचं भान कुणीच विसरू नये, असंही आदिक म्हणाले.

आदिक म्हणाले, बारामतीच्या जनतेवर आमचा विश्वास आहे. बारामतीकर मोठ्या मताधिक्याने सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभे राहतील. सात तारखेच्या निकालानंतर ज्यांनी चुकीची विधान केली, त्यांना त्यांच्या विधानाची जाणीव होईल, अशी आशा बागळतो.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज