नामदेव जाधव, म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार

नामदेव जाधव, म्हणतात मला शिवाजी महाराजांचा दृष्टांत झालाय… बारामती लोकसभा लढणार

Namdev Jadhav On Baramati Lok Sabha seat : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार आहे.

त्यात आता प्राध्यापक, लेखक, व्याख्याते व जिजाऊंचे वंशज असल्याचे सांगणारे नामदेव जाधव ( Namdev Jadhav) हेही बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

ही निवडणूक लढण्यासाठी शिवाजी महाराज यांनीच दृष्टांत दिल्याची पोस्टच नामदेव जाधव यांनी आपल्या फेसबुक पेजवर केली आहे.

आज पहाटे चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा दृष्टांत झाला आहे. बारा मावळ (बारामती) लोकसभा लढवावा असा संकेत दिला. बाकी आई भवानी चा आशीर्वाद आणि मावळ्यांची साथ आपणाला मिळेल असा शुभ संकेत दिला. स्वराज्याची संकल्पना पुन्हा मांडावी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदेश शिरसावंद्य. लवकरच श्री शंभु महादेवाचे दर्शन आणि कौल घेऊ आणि पुढील धोरण आणि तोरण ठरवू. हर हर महादेव, असे जाधव यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसा व्हिडिओही नामदेव जाधव यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

तीन एप्रिलला पुढील भूमिका मांडणार

बारामती लोकसभा मतदारसंघात तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे किल्ले येतात. या किल्ल्यांचा विकास करणे, समाजाचे उद्धार करणे यासाठी हा दृष्टांत झाला असावात.

त्यामुळे तीन एप्रिलला शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे नामदेव जाधव यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षणावरून शरद पवारांना अनेकदा घेरले !

बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले नामदेव जाधव यांनी अनेकदा शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) मराठा आरक्षणावर (Maratha reservation) कधीही स्पष्ट भूमिका घेत नसल्याचा आरोप देखील केला होता. जेव्हा राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे येतो तेव्हा तेव्हा शरद पवार राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण (Muslim reservation) दिले पाहिजे, त्यांना आरक्षण द्या, यांना आरक्षण द्या असं म्हणतात.

लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

शरद पवार नेहमीच ओबीसींच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का न लावता आरक्षण द्या असं का म्हणतात असं देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube