Nilesh Lanke : लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

Nilesh Lanke : लोकसभेसाठी लंकेंची जनसंवाद यात्रा! जयंत पाटलांसह राऊतांच्या उपस्थितीत शुभारंभ

Nilesh Lanke : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) चे उमदेवार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील वेगवगेळ्या भागात राहणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी लंके आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (UBT) नेते आणि खा. संजय राउत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत आपली स्वाभिमानी जनसंवाद यात्रा (Swabhimani Jansamvad Yatra) सुरु करणार आहे.

स्वाभिमानी जनसंवाद यात्रेचा आज (१ एप्रिल) सकाळी ११ वाजता पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मोहटादेवी गडावर शुभारंभ झाला. तर आता मंगळवारी स्वाभिमानी जनसंवाद यात्रा पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

पाथर्डीनंतर या यात्रेचे आयोजन जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये करण्यात येणार आहे. तर या यात्रेचा समारोप नगर येथील विशाल गणपती मंदीरात (Vishal Ganpati Temple) १६ एप्रिल रोजी होणार आहे.

माहितीनुसार यावेळी लंके यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदीत्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे (congress) जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) कडून उमेदवारी जाहीर होताच नीलेश लंके यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके आता मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न, समस्या याची माहिती घेणार असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.

यात्रेचे स्वरूप जाणून घ्या

स्वाभिमानी जनसंवाद यात्रा १ ते ४ एप्रिल दरम्यान शेवगाव विधानसभा मतदारसंघात राहणार आहे तर ५ ते ८ एप्रिल दरम्यान राहुरी,नगर विधानसभा मतदारसंघात राहणार आहे. तर कर्जत – जामखेड मतदारसंघात ९ ते ११ एप्रिल दरम्यान या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात १२ ते १४ एप्रिल दरम्यान या यात्रेचे आयोजन होणार असून १५ आणि १६ एप्रिल दरम्यान ही यात्रा अहमदनगर शहरात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज