सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार; उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदासाठी दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असल्याची

  • Written By: Published:
Sunetra Pawar

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदासाठी दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी होकार दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांची नरेश अरोरांसोबत झालेल्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नरेश अरोरा (Naresh Arora) हे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून, ते वरिष्ठ नेत्यांना याबाबतची माहिती देणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची विधिमंडळ बैठकही उद्या दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

उद्या दुपारी 2 वाजता होणाऱ्या राष्ट्रवादीच्या (NCP) बैठकीत विधिमंडळ नेतेपदी सुनेत्रा पवारांची निवडण होणार आहे. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

28 जानेवारी रोजी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे एका विमान अपघातात निधन झालं होतं. त्यामुळे अजित पवार यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तर आता या पदासाठी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवड करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ उभारा; आमदार महेश लांडगेंची प्रशासनाला सूचना

उद्या दुपारी होणाऱ्या या बैठकीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मुंबईला बोलावण्यात आलं असल्याची देखील माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

follow us