पवार कुटुंबातील मुलांशी लग्न केल्याने आम्ही पवार, सुप्रिया सुळे रक्ताने पवार

पवार कुटुंबातील मुलांशी लग्न केल्याने आम्ही पवार, सुप्रिया सुळे रक्ताने पवार

Sharmila Pawar on Pawar DNA : लोकसभेच्या रणसंग्रामात सुरुवातीपासून चर्चेत राहीलेला आणि सर्वांचं लक्ष लागलंय असा मतदारसंघ म्हणजे बारातमती. या जागेवरून नणंद भावजय असा हा राजकीय संघर्ष आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. दरम्यान, या निवडणुकीत फक्त राजकीय वार-प्रतिवार होत नसून कुटुंबावरही अनेक वार-पलटवार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी बाहेरचे पवार कोण आणि मुळ पवार कोण असा वाद प्रतिवाद सुरू आहे. त्यावर अनेकजण बोलले आहेत. परंतु, पहिल्यांदाच पवार कुटुंबातील महिला यावर बोलल्या आहेत. आज बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा यायोजीत करण्यात आला होता. त्यामध्ये शर्मिला पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.

 

डीएनएच पवार

यावर बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या, गेली अनेक दिवसांपासून मुळ पवार कोण यावरून टीका सुरू आहे. हा विषय अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. परंतु, मला सांगायचं आहे की, आम्ही पवारांच्या घरात त्यांच्या मुलांशी लग्न करून सुना म्हणून आलेलो आहोत. त्यामुळे सुन म्हणून आम्ही पवार झालो. मात्र, सुप्रिया सुळे या रक्ताने, जन्माने पवार आहेत. सुप्रिया सुळे यांचा डीएनएच पवार आहे असंही त्या म्हणाल्या. तसंच, ही गोष्ट सांगायला आम्हाला काही वावग वाटत नाही. आम्ही पवारांच्या सुना आहत याबद्दल अभिमान आहे. मात्र, आमची नणंद म्हणून जो काही सुप्रिया सुळे यांचा अधिकार आहे तो आम्हाला नको असंही शर्मिला पवार यावेळी म्हणाल्या आहेत.
युवकांचा मोठा प्रतिसाद

 

कोण आहेत शर्मिला पवार

शर्मिला पवार या श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत. त्या शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. शर्मिला यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला असून त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. शर्मिला यांनी आज बारामती येथे आयोजीत केलेल्या महिला मेळाव्यात वरील भाष्य केलं. सुप्रिया सुळे यांना मते देण्याचं आवाहनही त्यांनी यावेली मतदारांना केलं. आमच्या कार्यक्रमांना, रॅलींना आणि सभांना युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही शर्मिला पवार यांनी केला. तसंच, गेली अनेक दिवसांपासून श्रीनीवास पवारही सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिया झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज