.. तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार, वचननाम्यात ठाकरे गटाकडून भाजपवर हल्ला

.. तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार, वचननाम्यात ठाकरे गटाकडून भाजपवर हल्ला

Uddhav Thackeray On Modi Government: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रचाराची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी 5 जागांवर मतदान पार पडले आहे तर उद्या 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 8 मतदारसंघासह देशातील 89 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

तर दुसरीकडे आज शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून शिवसेना पक्षाचा वचननामा (Shivsena Vachanama) जाहीर करण्यात आला आहे. या वचननाम्यात शेतकरी आणि तरुणांसाठी मोठं मोठ्या घोषणा करण्यात आले आहे. याच बरोबर या वचननाम्यात मोदी सरकारला (Modi Government) काही प्रश्न देखील विचारण्यात आले आहे.

यावेळी देशाची निवडणूक भारत सरकार ऐवजी मोदी सरकार या नावाने लढविली जात आहे. त्यामुळे त्या मोदी सरकारला सुज्ञ मतदारांनी काही प्रश्न विचारायला हवेत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर मोदी सरकारला मत देणे मोठी चूक ठरणार आहे. असं या वचननाम्यात म्हटले आले आहे.

2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते त्याचे काय झाले? ऊन-वारा-पाऊस आणि हाडं गोठवणारी थंडी असताना शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ का येत आहे? प्रत्येकाच्या खात्यात रूपये 15 लाख जमा होणार होते त्याचे काय झाले? त्याऐवजी उद्योगपतींचे रूपये सव्वादोन लाख कोटी कर्ज का माफ करण्यात आले? वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देणार होतात, त्यानुसार 10 वर्षांत ही संख्या 20 कोटी होते. त्या नोकऱ्याचे काय झाले? गॅस, पेट्रोल, डिझेलच्या किंमती इतक्या कशा गगनाला भिडल्या ? देशात 100 स्मार्ट सिटी निर्माण होणार होत्या त्या कुठे गेल्या? गंगा मईया स्वच्छ का झाली नाही?

भ्रष्ट राजकारणी जेलमध्ये टाकण्याऐवजी स्वपक्षात का घेतले? नोटबंदी मुळे काय साध्य झाले ? महाराष्ट्राचे हक्क आणि अस्मिता पायदळी का तुडविली जात आहे? देशावर 1 लाख कोटी रूपयांचा कर्जाचा बोजा का वाढविला ? अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काय झाले ? इतर पक्ष भ्रष्ट आहेत म्हणणाऱ्या भाजपाचा इलेक्टोरल बाँड्स घोटाळा हाच सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरला.

लोकसभेसाठी शिवसेनेचा वचननामा जाहीर, ठाकरेंकडून शेतकरी, तरुणांसाठी ‘या’ मोठ्या घोषणा

अजून पीएमकेअर फंडाचा महाघोटाळा कधी बाहेर येणार ? याची सर्वजण उत्सुकतेने वाट पहात आहेत. असं प्रश्न जनतेने भाजपला मतदानापूर्वी विचारावी असं आवाहन या वचननाम्यात शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज