उद्धव ठाकरे काँग्रेसला तर राहुल गांधी करणार आपला मतदान, ‘हे’ आहे कारण

उद्धव ठाकरे काँग्रेसला तर राहुल गांधी करणार आपला मतदान, ‘हे’ आहे कारण

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील 5 लोकसभा मतरदारसंघासह आतापर्यंत देशातील 102 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर आता 26 एप्रिलला लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदार होणार आहे. तर मुंबईसह काही भागात 20 मे रोजी मतदान होणार आहे.

यावेळी शिवसेना पक्षप्रमुख ( ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस (Congress) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आपल्या पक्षाला नाहीतर दुसऱ्या पक्षाला मतदान करणार आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे कुटुंब करणार काँग्रेसला मतदान

उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला का? मतदान करणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. याचा कारण म्हणजे इंडिया आघाडीत झालेल्या जागावाटपामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे. सध्या उत्तर मध्य मुंबईत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब राहत आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा काँगेसला देण्यात आली आहे. यामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान करणार आहे.

अरविंद केजरीवाल तिहारमध्येच!, न्यायालयीन कोठडी वाढली 

राहुल गांधी करणार आपला मतदान

इंडिया आघाडीकडून नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात (New Delhi Lok Sabha Constituency) आपचा (AAP) उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. या मतदारसंघात सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांचे मतदान आहे. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी देखील काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता आपच्या उमेदवाराला मतदान करणार आहे.

नाथाभाऊंच्या भाजपवापसीला ब्रेक! राज्यातील नेत्यांचा दिल्लीत डाव अन् रखडला पक्षप्रवेश

लोकसभा निवडणुकीचा निकाल 04 जून 2024 रोजी जाहीर होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार की इंडिया आघाडी भाजपला धक्का देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube