वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत

वंचितला धक्का! आंबेडकरांचे आदेश धुडकावत जिल्हाध्यक्ष महाविकास आघाडीसोबत

Shailesh Gavai : वंचित बहूजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. अमरावती लोकसभा मतदार संघात वंचितचे (Vanchit Aghadi) जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी वेगळी भूमिक घेतली आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा आदेश धुडकावत गवई यांनी येथील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमरावती लोकसभेचे गणित बदललं असून गवई यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीची ताकद वाढली असली, तरी वंचितला हो मोठा धक्का मानला जात आहे.

 

समन्वय नाही

याबाबत बोलताना, गवई यांनी काही गंभीर आरोप केले आहेत. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. परंतु, या पाठिंब्यानंतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. मात्र, प्रचारामध्ये वंचित आणि रिपब्लिकन सेनेमध्ये कोणताच समन्वय नसल्याचं स्पष्टीकरण गवई यानी दिलं आहे. तसंच, यामध्ये कुणीच सक्रीय नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

 

आमच्याच पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले

यावेळी माध्यमांशी बोलताना, गवई यांना वागणूक चांगली मिळाली नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. गवई म्हणाले, रिपब्लीकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला चांगली वागणूक दिली जात नाही. सालगडी असल्याप्रमाणे वागवलं जातं असा गंभीर आरोपच गवई यांनी केला आहे. तसंच, गेली अनेक दिवसांपासून आपण आनंदराज आंबेडकरांसोबत आहोत. परंतु, वंचितला सोबत घेऊन कोणत्याही प्रचाराचं नियोजन करण्यात आलं नाही. उलट आमच्याच पदाधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले जात आहेत, असा थेट आरोप करत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती असंही गवई यावेळी म्हणाले आहेत.

 

आंबेडकरी समाज आंबेडकर घराण्यासोबत

वंचितचे जिल्हाध्यक्ष गवई यांची प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून ते तसेही प्रचारामध्ये सहभागी झालेले नाहीत. येथील सायन्सौकर मैदानात काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेमध्येही ते कुठेच नव्हते. तसंच, अस काही होणार हे आम्हाला यापूर्वीच माहिती होत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. तसंच, आंबेडकरी समाज हा आंबेडकर घराण्यासोबत प्रामाणिक असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube