जमीन खरेदी ते मनोरमा खेडकरांना धमकी; वकीलांचा न्यायालयात भलताच दावा…

जमीन खरेदी ते मनोरमा खेडकरांना धमकी; वकीलांचा न्यायालयात भलताच दावा…

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणात चर्चेत आलेल्या त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना रायगडच्या एका हॉटेलमधून पोलिसांनी अटक केलीयं. दरम्यान, जमीन खरेदी प्रकरणी हातात पिस्तूल घेत एका शेतकऱ्याला दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच मनोरमा यांनी पुण्यातून पळ काढत रायगडच्या हॉटेलमध्ये आसरा घेतला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर पूजा खेडकर यांच्या वकीलांनी न्यायालयात भलताच युक्तिवाद केलायं. शेतकऱ्याला धमकावलं नसून याउलट घटनेच्या एक दिवस आधी मनोरमा खेडकरांना धमकावल्याचा दावा वकीलांनी केलायं.

मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न…; जयंत पाटलांची बोचरी टीका

मनोरमा खेडकरांच्या वकीलांचा युक्तिवाद :
मनोरमा खेडकर यांनी जमीन २००६ साली खरेदी केली होती. मनोरमा यांच्याकडे पिस्तुलाचे लायसन्स असून आतापर्यंत त्यांच्यावर एकही गुन्ह्याची नोंद नाही. त्यांच्याविरोधात ३०७ कलम काल अचानक ॲड करण्यात आले आहे. त्याआधीचे सर्व सेक्शन बेलेबल आहेत. आम्ही तपासात सहकार्य करणार आहोत. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्ररीवरुन पासलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालायं.

गुन्ह्यात पोलिसांनी तपास करुन चार्ज शीट दाखल केले असताना एक वर्षाने पुन्हा त्याच घटनेत खेडकर यांना आरोपी करण्यात आलेयं. मीडिया रिपोर्टस पाहून एक वर्षाने तक्रार देण्यात आली आहे. एक वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कारण ही पोलिसांनी दिलेले नाही. एक वर्षापूर्वी खेडकर यांनी या प्रकरणी पौड पोलीस स्टेशनला अर्ज दिलायं. त्यांचे म्हणणे दिले आहे.

२४ वर्षे खेडकर पिस्टल वापरत असून मागील २४ वर्षात पिस्टलवरुन एक ही गुन्हा किंवा तक्रार नाही. आम्ही पिस्टल आणि लायसन्स सरेंडर करायला तयार आहोत. कोर्टाला मोबाईलवरील मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ दाखवला जात आहे. पासलकर यांचे आठ लोक घटनास्थळी उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी पिस्टल हातात ठेवणे गैर नाही. घटनेच्या आदल्याच दिवशी खेडकर यांची गाडी आडवण्यात आली होती. त्यांना धमकावण्यात आले होते. आदल्या दिवशी खेडकर यांनी पौड पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली होती. त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी पिस्टल बरोबर ठेवले असल्याचा युक्तिवाद खेडकरांच्या वकीलांनी केलायं.

दरम्यान, मनोरमा खेडकर यांच्याकडील पिस्तूल, लॅंड क्रुझर, जप्त करावयाची असून संबंधित आरोपी प्रभावशाली आहे, त्यामुळे ते फिर्यादींवर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यासाठी इतर आरोपींनाही अटक करायची आहे. त्यासाठी पोलिस कस्टडी मिळावी. मीडिया रिपोर्टस् आणि व्हायरल व्हिडिओ पाहून फिर्यादीमध्ये एक वर्षानंतर तक्रार देण्याचे बळ आले आहे. याआधी पासलकर यांच्यावर दबाव असल्यानेच ते तक्रार देत नव्हते, असा युक्तिवाद सरकारी वकीलांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube