पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास

पूजा खेडकरांच्या अडचणीत आणखी वाढ; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगही करणार तपास

IAS Pooja Khedkar : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात युपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर  (UPSC) गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची एन्ट्री झाली आहे. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का या महत्वाच्या मुद्द्यासह अन्य गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगानेही (युपीएससी) काल तपासणी अहवाल आल्यानंतर पूजा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pooja Khedkar : UPSC च्या कारवाईत फोलपणा? गुन्हा दाखल झाला ‘पण’ वेगळ्याच कारणासाठी 

या प्रकरणात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग पूजा खेडकर यांनी OBC प्रवर्गाचा गैरवापर केलाय हे तपासणार आहे. तसेच आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकरांसदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. आयोगानं याबाबत वैयक्तिक प्रशिक्षण विभागाकडे (डीओपीटी) विचारणा केली. आयोगाकडून आता लवकरच एक ड्राईव्ह सुरू केला जाणार आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरातून आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेणार असल्याचे सांगण्यात आले.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. आता आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पूजा खेडकर कुटुंबियांना आणखी एक धक्का; महापालिकेने कंपनीच केली सील

खेडकर कुटुंबियांची कंपनी सील

तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pune News) सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख 77 हजार रुपयांचा कर थकीत आहे. यामुळे महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाने कंपनीला सील ठोकले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube