Pooja Khedkar : UPSC च्या कारवाईत फोलपणा? गुन्हा दाखल झाला ‘पण’ वेगळ्याच कारणासाठी…

Pooja Khedkar : UPSC च्या कारवाईत फोलपणा? गुन्हा दाखल झाला ‘पण’ वेगळ्याच कारणासाठी…

नवी दिल्ली : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS officer Pooja Khedkar) यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाव बदलून परीक्षा देणे, आयोगाची फसवणूक करणे अशा आरोपांवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय तुमची निवडच का रद्द करु नये, अशी विचारणा करत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सोबतच त्यांना यापुढे परिक्षेला बसण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आयोगाने खेडकर यांच्यावर ही कारवाई केली आहे. (Case has been registered against the controversial IAS officer Pooja Khedkar on charges of changing the name of the exam and cheating the Public Service Commission)

दरम्यान, खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरीही यातून प्रमुख मुद्दाच गायब असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या कारवाईत फोलपणा आहे का? असा सवाल विचारला जात आहे. खेडकर यांच्यावर नाव बदलून परीक्षा देण्याचा आरोप तर आहेच. पण त्यांच्यावर प्रमुख आरोप आहे तो, अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र जोडणे, वडिलांचे उत्पन्न जास्त असूनही ओबीसी नॉन क्रिमिलेअर कोट्यातून परीक्षा देणे.  हेच दोन्ही मुद्दे खेडकर यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातून गायब आहेत.

मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांच्यावर दुसरी मोठी कारवाई; UPSC कडून गुन्हा दाखल

तपासाअंती आयोगाने खेडकर यांच्यावर केवळ जास्त वेळा परीक्षा दिल्याच्या आरोपात दोषी धरले आहे. परीक्षा नियम डावलून परीक्षा दिली, प्रयत्न संपल्यानंतर अनेकवेळा परीक्षा दिली. जे की आयोगाच्या नियमात बसत नाही. ओळखपत्र बदलून, आई वडिलांचे आणि स्वतःचे नाव बदलून परीक्षा दिल्या. ई मेल आयडी, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदलली, असा ठपका आयोगाने खेडकर यांच्यावर ठेवला आहे. 

दिलीप खेडकर लाच प्रकरण; रामदास कदमांचं आदित्य ठाकरेंकडं बोट, नक्की काय आहे आरोप?

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर कार्यालयात राजेशाही वागण्यापासून ते बोगस अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचे विविध आरोप त्यांच्यावर आहेत. या प्रकरणी पंतप्रधान कार्यालय, कार्मिक मंत्रालय, केंद्रीय लोकसेवा आयोग, मसुरी येथील लाल बहाद्दूर शास्त्री अकादमी अशा सर्वांनी अहवाल मागविला होता. यापूर्वी राज्य शासनाने सादर केलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने परत बोलावून घेतले आहे. राज्य शासनानेही त्यांना तातडीने कार्यमुक्त केले आहे. आता आयोगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube