ग्लॅमरच्या दुनियेत न अडकता नवा मार्ग; युपीएससी क्रॅक करत अभिनेता अभय डागाची आयपीएस पदाला गवसणी
Abhay Daga हा अभिनेता असूनही त्याने यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 185 रॅंक मिळवत आयपीएस अधिकारी झाला आहे.
A new path without getting stuck in the world of glamour; Actor Abhay Daga cracks UPSC and vie for IPS post : मनोरंजन विश्वामध्ये दररोज नवनवीन चेहरे येतात. मात्र यातील काहीच यशस्वी होतात. तर काही मागे पडतात. मात्र यामध्ये काही जण स्वतः स्वतःचा मार्ग बनवतात आणि अविस्मरणीय ठरतात. यातीलच एक नाव म्हणजे अभय डागा यांनी मात्र अभिनय सोडून देशसेवेचा रस्ता धरला. त्यामुळे अनेकदा ग्लॅमरच्या दुनियेत स्वतःला हरवून बसणाऱ्या कलाकारांसाठी अभय हा अनेकांसाठी आदर्श ठरला आहे. कारण युपीएससी या देशातील सर्वोच्च परीक्षा मानल्या जाणाऱ्या यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 185 रॅंक मिळवत आयपीएस अधिकारी झाला आहे.
पावसाचा निरोप थंडीचं आगमन! मराठवाड्यात कडाक्याची थंडी, हवामान अंदाज काय?
अभय डागाबद्दल सांगायचं झालं. तर त्याने टीव्ही जगतातील लोकप्रिय शो असलेल्या सिया के राम यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर त्याने आयआयटी खरकपुर या ठिकाणहून कॉम्प्युटर्स सायन्सची पदवी घेतली आहे. अभिनय क्षेत्रात येण्याच्या अगोदर त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून काम केलं आहे. याच काळात त्याने थिएटर आणि अभिनयामध्ये देखील नशीब आजमावलं मात्र झगमगत्या दुनियेत त्याने जास्त काळ न राहता देश सेवेकडे जाण्याचा ठरवलं.
‘त्या’ लाभार्थी महिलांसाठी करणार बदल; लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री तटकरेंची मोठी माहिती
2018 मध्ये अभयने मायक्रोसॉफ्ट जॉईन केलं. तेथे त्यांनी भारतातील वाढत्या डिजिटल फ्रॉडच्या विरुद्ध काम करणाऱ्या सायबर सिक्युरिटी टीममध्ये काम केलं. 2021 मध्ये कोरोना काळात त्याने नोकरी आणि अभिनय दोन्ही सोडून सिविल सर्विसेसची तयारी करायला सुरुवात केली. त्यानंतर 2023 मध्ये पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि संपूर्ण देशात 185 बँक मिळवत यशाला गवसणी घातली. त्यामुळे आपल्या आयुष्यात त्याने अभिनेता, तंत्रज्ञान विशेषज्ञ आणि आता एक अधिकारी अशा तीन भूमिका निभावल्या आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये अभयाने हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमध्ये ट्रेनिंग सुरू केलं आहे. तर 2025 मध्ये उत्तर प्रदेश केडर मिळालं आहे. मात्र तो महाराष्ट्रातील आहेत.
