शिवाजीराव कर्डिलेंची ताकद वाढली; कुरणवाडीकरांचा भाजपात प्रवेश…
Shivajirao Kardile : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने कंबर कसलीयं, तर आजी-माजी आमदारांकडूनही यंदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच आता राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांची ताकद वाढल्याचं दिसून येत आहे. राहुरी मतदारसंघातील कुरणवाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपात (BJP) प्रवेश केलायं. या प्रवेशामुळे शिवाजीराव कर्डिलेंची मतदारसंघात ताकद वाढलीयं.
हरियाणात वारं फिरलं, भाजपाची मुसंडी; अडखळलेला शेअर बाजारही फुल्ल चार्ज!
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु आहेत. येत्या 13 ऑक्टोबरनंतर कधीही विधानसभा निवडणुकीचा घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात कधीही निवडणूक लागू शकते, या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून आपापल्या मतदारसंघात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्राजक्त तनपुरे विद्यमान आमदार आहेत. तर महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले हेच उमेदवार असतील, असा दावा केला जात आहे. मागील निवडणुकीत कर्डिले यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत बाजी मारण्यासाठी कर्डिलेंकडून रणनीती आखली जात आहे.
संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ताल, दांडिया स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कुरणवाडीमधील नागरिकांसमोर अनेक प्रश्न होते. या प्रश्नांची माहिती घेऊन शिवाजीराव कर्डिले यांनी प्राधान्याने सोडवण्याचं काम केलं आहे. कर्डिले यांच्या कामाच्या पद्धतीची भुरळ कुरणवाडीच्या नागरिकांना पडली. त्यानंतर त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. कुरणवाडीच्या नागरिकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलायं. यामध्ये सुरेश दादा बनकर, रवींद्र म्हसे, अक्षय तनपुरे, समीर पठाण, सारंग खिलारी, चांगदेव खिलारी, राहुल खिलारी, शिवाजीराव केदारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश आहे.