माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी घेतली अजित पवारांची भेट… राजकीय चर्चांना उधाण

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी घेतली अजित पवारांची भेट… राजकीय चर्चांना उधाण

Shivaji Kardile Met Ajit Pawar : लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) संपले असून राज्यात ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Elections) पार पडणार आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांपूर्वी नगरचे राजकारणात एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Shivaji Kardile) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे. दोघांचे भेटीचे फोटो युवानेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांच्याकडून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले आहे. या भेटीचे फोटो समोर येताच नगर जिल्ह्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून (Rahuri Assembly Constituency) पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले इच्छुक असून त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी देखील सुरु केली आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेकदा आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त देखील केली आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव झाल्याने कर्डिले यांच्या मनात देखील धाकधुक निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. नगर शहराची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे विद्यमान आमदार आहेत. तर या जागेवर भाजपकडून देखील दावा करण्यात येत असून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

सरपंच ते मुख्यमंत्री, जाणून घ्या ओडिशाचे नवीन मुख्यमंत्री मोहन माझी यांचा राजकीय प्रवास

संग्राम जगताप हे शिवाजी कर्डिले यांचे जावई असून येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने नगर शहराच्या जागेबाबत तर चर्चा झाली नसेल ना अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे.

300 कोटींचा वाद अन् सासऱ्याची सुनियोजित हत्या, नागपूर हिट अँड रन प्रकरणात मोठं ट्विस्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज